आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्राध्यापकांना श्रम कमी, अर्थार्जन जास्त

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- सध्या शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात मोठी दरी निर्माण झाली आहे. शिक्षक आणि प्राध्यापकांना कमी श्रमात जास्त अर्थार्जन होत असूनही विविध मागण्यांसाठी संप करून ते विद्यार्थ्यांना वेठीस धरत आहेत, असे परखड मत खान्देश कॉलेज एज्युकेशन (केसीई) आणि लेवा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेंडाळे यांनी रविवारी व्यक्त केले.

जळगावातील ज्येष्ठ दांपत्य भागवत पाटील आणि मालतीताई यांनी त्यांचे राहते घर तीन वर्षापूर्वीच विद्यार्थी सहायक समितीला दान केले होते. रविवारी त्याचा लोकार्पण सोहळा झाला. यावेळी आयोजित कार्यक्रमात बेंडाळे यांनी शिक्षण क्षेत्रातील चुकीचा गोष्टींबाबत परखड मत व्यक्त केले. बेंडाळे म्हणाले, की प्राध्यापकांच्या विरोधात अण्णा हजारे यांनी आंदोलन करावे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात आणि देशातही ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांची लेक्चर्स घेतली जात नाहीत, असा आपला अभ्यास आहे. प्राध्यापकांच्या या आडमुठ्या धोरणाच्या विरोधात पालकांनी वेळी जागरूक झाले पाहिजे. पालकांनी त्यांना काम न करण्याबाबत उत्तर विचारले पाहिजे.

‘आमचे अंत्यसंस्कारही आता समितीनेच करावेत’- आयुष्यभर कष्ट करून संसार थाटणारे अनेक आहेत, मात्र काही सामान्यांतील असामान्य माणसांप्रमाणे भागवत पाटील यांनी आपले स्वत:चे राहते घर विद्यार्थी सहाय्यक समितीला दान केले, त्याबद्दल त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी भावूक झालेल्या पाटील यांनी ‘आता, समितीनेच आपली काळजी घ्यावी आणि आपले अंत्यसंस्कारही समितीच्या माध्यमातून विविध जातीधर्माच्या नागरिकांनी करावे’ असे सांगत अश्रूंना मोकळी वाट करून दिली.