आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘पद्मावती’ चित्रपटाचे पोस्टर फाडून निषेध, प्रदर्शित केल्यास थिएटर जाळण्याचा इशारा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पद्मावती चित्रपटाचे पोस्टर फाडून नेताना राजपूत समाजाचे कार्यकर्ते. - Divya Marathi
पद्मावती चित्रपटाचे पोस्टर फाडून नेताना राजपूत समाजाचे कार्यकर्ते.
जळगाव- ‘राणी पद्मावती’ चित्रपट प्रदर्शित करण्यात येऊ नये. तसेच हा चित्रपट प्रदर्शित केल्यास थिएटर जाळून टाकण्याचा इशारा जिल्ह्यातील क्षत्रीय राजपूत समाजाच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी दुचाकी रॅली काढून दिला. तसेच खान्देश सेंट्रलमधील आयनॉक्स थिएटरमध्ये लावलेले फोस्टर फाडून कार्यकर्त्यांनी निषेध करीत जोरदार घोषणाबाजी केली. 

जिल्हाभरातून आलेल्या क्षत्रीय राजपूत समाजाच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी दुपारी १२ वाजता बहिणाबाई चौकातील महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यापासून दुचाकी रॅली काढली. रॅली रिंगरोड मार्गे नेहरू चौकात आल्यानंतर कार्यकर्त्यांनी रिगल थिएटरच्या व्यवस्थापकांना निवेदन दिले. त्यानंतर आयनॉक्स थिएटर येथील व्यवस्थापकांनाही निवेदन दिले. तेथे पद्मावती चित्रपटाचे पोस्टर लावलेले आढळून आल्याने कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त करीत ते पोस्टर फाडून टाकले. तसेच त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. हा चित्रपट प्रदर्शित करण्याबाबत त्यांनी चित्रपटगृहाच्या व्यवस्थापकांना विनंती केली. त्यांनी या कार्यकर्त्यांना चित्रपट प्रदर्शित करण्याची ग्वाही दिली. त्यानंतर नटवर, अशोक राजकमल थिएटरच्या व्यवस्थापकांनाही निवेदन दिले. कार्यकर्त्यांनी सर्व थिएटरमध्ये जाऊन पद्मावती चित्रपटाचे पोस्टर लावलेले नसल्याबाबत खात्री केली. याप्रसंगी क्षत्रीय राजपूत समाजाचे महेेंद्रसिंह पाटील, रमाकांत राजपूत, दामू राजपूत (भुसावळ), प्रथमेशसिंह राजपूत (धरणगाव), सुनील राजपूत (एरंडोल), अमरसिंग राजपूत (एरंडोल), सागर राजपूत (दीपनगर) यांच्यासह जिल्हाभरातील बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. 

...तर जौहरच्या अग्निकुंडातील पवित्र राखेची शपथ... 
चित्रपटातूनइतिहासाचे विद्रूपीकरण, विकृतीकरण इतिहासाच्या मूळ गाभ्यालाच धक्का पोहोचवल्यामुळे भारतीय संस्कृतीला तडा जात आहे. हे कदापि खपवून घेतले जाणार नाही. भारतीय स्त्रियांच्या विटंबनेचा हा प्रकार सर्रास होत आहे. आपल्या शील रक्षणासाठी १५ हजार स्त्रियांसह आहुती देत भारतीय स्त्रियांची अस्मिता राणी पद्मावती यांनी जोपासली. त्यांच्या पवित्र चारित्र्यास कलंकीत करण्याचा प्रयत्न म्हणजे तमाम स्त्री शक्तीचा घोर अपमान नव्हे, बदनामी म्हणावी लागेल. 
 
राणी पद्मावती या केवळ व्यक्ती राहता त्या भारतातील संपूर्ण स्त्री शक्तीचे प्रतीक प्रेरणा आहेत. या चित्रपटातून अल्लाउद्दिन खिलजीची विकृत कल्पना पडद्यावर दाखवली जाणार असेल तर जौहरच्या अग्निकुंडातील पवित्र राखेची शपथ घेऊन राजपूत समाजच नव्हे तर संपूर्ण भारतीय समाज अशा विकृत प्रवृत्तीला माफ करणार नाही. या सर्व बाबी लक्षात घेता या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालावी. तरीदेखील हा चित्रपट प्रदर्शित केल्यास कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास सर्वस्वी आपण जबाबदार रहाल, असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. 
बातम्या आणखी आहेत...