आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव किरण कळस्करचा प्रोजेक्ट; एकाच अँटेनात ३-जी, ४-जी, ५-जी तंत्रज्ञान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - एकाच अँटेनात ३-जी, ४-जी, ५-जी अाणि वाय-फाय देणारे तंत्रज्ञान जळगावातील विद्यार्थिनीने विकसित केले अाहे. या प्रकल्पाची निवड १६ डिसेंबरला हाेणाऱ्या अायईईईच्या परिषदेसाठी झाली अाहे. तसेच या प्रकल्पास भारतीय अंतराळ संस्थेकडून (इस्त्राे) मान्यतेची माेहोर मिळाली अाहे.

जळगाव येथील रहिवासी व सध्या पुणे येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेली किरण प्रभाकर कळस्कर हिने ‘अॅनालिसिस अाॅफ एमअायएमअाे अँटेनाज विथ पॅरासिटिक एलिमेंट्स अाॅफ वायरलेस अॅप्लिकेशन’ नावाचा प्रकल्प तयार केला अाहे. या प्रकल्पात मिमाे (मल्टिपल इनपुट अॅण्ड मल्टिपल अाऊटपुट) तंत्रज्ञानाचा वापर केला अाहे. माेबाइल कंपन्यांना सध्या ३-जीसाठी वेगळा अँटेना तर ४-जी अाणि वायफायसाठी वेगळा अँटेना वापरावा लागताे; परंतु अाता मिमाे तंत्रज्ञानामुळे ३-जी, ४-जी, वायफायच नव्हे तर ५-जी सुद्धा एकाच अँटेनावर वापरता येईल. तसेच रडारसाठीही हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरणार अाहे. या अँटेनाची साइज फक्त १.६ मिमी अाहे. यामुळे डाटा वेगाने मिळेल. जळगावतील रहिवासी प्रभाकर कळस्कर व शारदा कळस्कर यांची किरण ही मुलगी अाहे. प्रकल्पासाठी तिला डॉ. जे.आर.गणगणे यांचे मार्गदर्शन मिळाले.

परिषदेत सादरीकरण :
अायईईई इंटरनॅशनल काॅन्फरन्स अाॅन काॅम्प्युटॅशनल इंटेलिजन्स अॅण्ड काॅम्प्युटिंग रिसर्च सेंटरतर्फे १६ डिसेंबर राेजी चेन्नई येथे परिषद हाेत अाहे. परिषदेत या प्रकल्पाचे सादरीकरण किरण करणार अाहेत.
बातम्या आणखी आहेत...