आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हॉट्सअॅपद्वारे १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेचा प्रचार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यावल - सध्यासोशल नेटवर्किंगमुळे जग अधिक जवळ आले आहे. त्यामुळे माहितीचे आदान-प्रदान अधिक जलदगतीने होत असल्याने, विधायक कामांसाठी वापर वाढला आहे. याच सोशल नेटवर्किंगचा एक भाग असलेल्या व्हॉट्सअॅपचा प्रभावी करून, साकळी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. फिरोज तडवी शासनाच्या १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेच्या माहितीचा प्रसार करत आहेत.

व्हॉट्सअॅपचा विघातक वापर झाल्याची अनेक उदाहरणे समोर आली आहे. या माध्यमातून अफवांचे पीक जलदगतीने पसरते, त्यामुळे अनेक ठिकाणी वाद झाल्याचे प्रकारही घडले आहेत. मात्र, याच व्हॉट्सअॅपचा विधायक वापर केल्यास, गरजूंपर्यंत शासकीय योजनांची माहिती पोहोचवता येते, हे डॉ. तडवी यांनी दाखवून दिले आहे. त्यामुळे वेळप्रसंगी गंभीर रुग्णांचे प्राण वाचवण्यास मदत मिळते. १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेची मदत कशाप्रकारे मिळवावी, याबाबत डाॅ. तडवी यांनी संदेश तयार करून तो अनेक ग्रुपवर टाकला आहे. अनेक ठिकाणी प्रसारित झालेला हा संदेश ग्रामीण भागातही पोहोचला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेबाबत जनजागृती झाली आहे. त्यामुळे परिसरात कुठेही दुर्दैवी घटना घडल्यास नागरिक या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. यासोबतच शासनाच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या योजनांची माहिती त्यांनी व्हॉट्सअॅपवर शेअर केली आहे.

ग्रामीण भागातही झाली जनजागृती
एकाकवितेच्या संदेशाच्या माध्यमातून डॉ. तडवी यांनी १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेची माहिती देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या प्रयत्नाला सध्या चांगलाच प्रतिसाद लाभत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातूनही आता रुग्णवाहिकेसाठी कॉल येत आहेत. त्यामुळे शासनाच्या उपक्रमाला वाढता प्रतिसाद मिळत आहे.

भावना रुजली
दुर्घटनाग्रस्तांनामदत करण्यासाठी १०८ क्रमांकावर कॉल केल्यास संबंधितांना तत्काळ वैद्यकीय सेवा मिळते. त्यामुळे अपघातग्रस्ताचे प्राणही वाचू शकतात. ही भावना या व्हाॅट्सअॅपवरील संदेशामुळे युवकांमध्येही रुजली आहे.

कवितेतून दिला संदेश
अपघातबघितल्यास फिरवू नका पाठ, फिरवा फक्त १०८. हृदयविकाराचा झटका पाहू नका वाट, फिरवा फक्त १०८. भीती तुम्हाला कशाची, १०८ आहे तुमच्या पाठिशी. आहे सुसज्ज आमची रुग्णवाहिका, हे तुम्हाला माहित आहे का. येते तुमच्या दारी, १०८ लय भारी. जीव वाचले अनेक, काम आहे नेक.

उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला
उपचारासाठीग्रामीण भागातील रुग्णांना वाहनांची समस्या भेडसावते. त्यामुळे १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेची माहिती व्हॉट्सअॅपद्वारे देण्याचा निर्णय घेतला. यामुळे उपक्रम सुरू केला आहे. डॉ.फिरोज तडवी, वैद्यकीय अधिकारी, साकळी पीएचसी