आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात मालमत्तांच्या माेजणीला सुरुवात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - गेल्या१८ वर्षांपासून शहरात हाेऊ शकलेल्या मालमत्तांच्या माेजणीला येत्या दाेन दिवसांत सुरुवात हाेणार अाहे. बळीरामपेठ नवीपेठेपासून या माेजणीचा श्रीगणेशा हाेईल. चार वर्षांत संपूर्ण शहरातील मालमत्तांचे मूल्यांकन करण्यात येणार अाहे. त्यामुळे गतकाळात नवीन बांधकाम करूनही त्याबाबत लपवाछपवी करणा-यांची करचाेरी लवकरच उघड हाेणार अाहे. या माेजणीतून पालिकेच्या उत्पन्नात दरवर्षी १० ते १२ काेटींची वाढ अपेक्षित अाहे.

जळगाव शहराचा विस्तार झपाट्याने हाेत अाहे. तसेच घरांची बांधकामेही माेठ्या प्रमाणात झाल्याचे खरेदी-विक्री व्यवहारांवरून स्पष्ट हाेते. सुमारे ८० हजारांपेक्षा जास्त मालमत्ता असतानाही पालिकेच्या दप्तरी मात्र त्यांची नाेंद १५ ते २० हजारांनी कमी अाहे. त्यामुळे महापालिकेचा काेट्यवधी रुपयांचा महसूल बुडताेय. सन १९९७मध्ये शहरातील मालमत्तांची माेजणी करण्यात अाली हाेती. त्यानंतर १८ वर्षे उलटूनही शहरातील मालमत्तांची माेजणी हाेऊ शकलेली नाही. परंतु, अाता पालिकेच्या महसूल विभागाने हे काम हाती घेतले अाहे.

दरराेजदाेन तास माेजणी
शहराचेचार प्रभाग समित्यांमध्ये विभाजन करण्यात अाले अाहे. प्रत्येक प्रभाग समितीत सरासरी वाॅर्ड अाहेत. या प्रभाग समित्यांच्या कर्मचा-यांना दरराेज दाेन तास मालमत्तांची माेजणी करावी लागणार अाहे. त्यातून मागच्या नाेंदी अाताच्या नाेंदींतील तफावत शाेधण्यात येईल. चार वर्षांत संपूर्ण शहरातील मालमत्तांची माेजणी पूर्ण केली जाईल. चार प्रभागांतून वर्षाकाठी १० काेटी रुपयांचे उत्पन्न वाढेल, अशी अपेक्षा प्रशासनाला अाहे.

मालमत्तांमधील बदल समजणार
शहरातब-याच वर्षांपासून मालमत्तांची नव्याने माेजणी हाेऊ शकलेली नाही. त्यामुळे बांधकामात केलेला बदल मालमत्तांची माहिती पालिकेकडे असणे गरजेचे अाहे. नवीन डाटा रजिस्टर तयार करायचे असल्याने त्यांची सखाेल माहिती घेण्यासाठी माेजणीला सुरुवात करत अाहाेत. प्रदीपजगताप, उपायुक्त, मनपा