आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘दिव्य मराठी’तर्फे १३ ते १५पर्यंत प्रदर्शन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - तुम्ही स्वत:चे हक्काचे घर घेण्याचे स्वप्न बघत आहात...आता गृहकर्जाचे दरही झालेत कमी...घर घेण्याची संधी चालून आली अाहे. नाशिकमधील स्मार्ट सिटी प्रकल्पामध्ये सुखवस्तू फ्लॅट टुमदार बंगला बघण्यासाठी ‘दिव्य मराठी’तर्फे १३ ते १५ जानेवारीदरम्यान यशोदया मल्टिपर्पज हॉल, रिंग रोड येथे भव्य प्रॉपर्टी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. 
भारतातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या आरोग्यदायी स्मार्ट नाशिक शहरात आपल्या स्वप्नातील फ्लॅट, बंगला किंवा प्लॉट खरेदी आणि गुंतवणुकीचे असंख्य पर्याय या प्रदर्शनात एकाच ठिकाणी जळगावात उपलब्ध होणार आहेत. युनायटेड बिल्डर्स स्मार्ट सिटी नाशिक या प्रकल्पातील फ्लॅट, बंगला प्लॉट खरेदीची संधी नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. १३ ते १५ जानेवारीदरम्यान सकाळी ११ ते रात्री वाजेदरम्यान हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे. प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांना आकर्षक भेटवस्तू मिळवण्याचीही संधी उपलब्ध आहे. या संधीचा लाभ घेण्यासाठी अधिकाधिक नागरिकांनी प्रदर्शनाला भेट द्यावी,असे आवाहन करण्यात येत आहे.