आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Property Use For Business Purpose Issue In Jalgon

प्रांताधिकाऱ्यांकडून पाच जणांच्या मालमत्ता जप्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव : शहरात विनापरवाना जमिनीचा व्यावसायिक वापर केल्याप्रकरणी जळगाव प्रांताधिकाऱ्यांनी जणांच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत, तर ३३ बड्या व्यावसायिकांना दिवसांत दंड भरण्याची नोटीस बजावली आहे.
आठवडाभरात दंड भरून व्यावसायिक वापरासाठी परवानगी घेतल्यास त्यांच्या मालमत्तादेखील शासनजमा करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

जळगाव शहरात अनेक वैद्यकीय व्यावसायिकांनी घराच्या प्लॉटसाठी घरगुती दराने अकृषक परवाना घेतला आहे. घरगुती वापरासाठी अकृषक परवानगी असली, तरी तेथे व्यावसायिक वापर होत असल्याचे आढळून आल्याने प्रांताधिकाऱ्यांनी संबंधितांना नोटीस बजावून कारवाई केली आहे. यात अनेक डॉक्टरांनी दंड भरून व्यावसायिक वापरासाठीची परवानगीसुद्धा घेतली आहे.
दरम्यान, महसूल विभागाच्या सर्वेक्षणात आणखी अनेक जण बेकायदेशीररीत्या जमिनीचा व्यावसायिक वापर करीत असल्याचे आढळून आले आहे. त्यांना परवानगी आणि दंड भरण्यासाठी आठवड्याची मुदत देण्यात आली आहे. नोटीस बजावण्यात आलेल्या ३३ जणांकडून एकूण ६१ लाख २० हजार ६८३ रुपये ऐवढा दंड आकारण्यात येणार आहे.
दंड भरणाऱ्यांवर पुढील आठवड्यात मालमत्ता जप्तीची कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, यापूर्वी नोटीस बजावण्यात आलेल्या ३२ जणांनी १९ लाख ७२ हजार ६७५ रुपये दंड भरून व्यावसायिक परवानगी घेतली आहे. त्यात बहुतांश डॉक्टरांचा समावेश आहे.

शहरात शोध मोहीम

शहरातील विविध भागांमध्ये घरगुती वापरासाठी एन.ए. परवानगी असताना प्रत्यक्षात त्या जागेचा व्यावसायिक वापर होत असल्याचे लक्षात आल्याने त्यासंदर्भात महसूल विभागाकडून शहरात तपासणी सुरू आहे. अनेक ठिकाणी पंचनामे करण्यात येत आहेत.

यांच्या मालमत्ता जप्त

संजयपाटील (दंडाची रक्कम-१०३०३४), उल्हास बेंडाळे (११६४२४), अब्दुल गनी शे इब्राहिम (८१५५२), शांताबाई चाैधरी (९८५२७), प्रितेश वैद, तरसाेद (६०१६०)
यांना बजावल्या नोटीसा

प्रकाश जाखेटे, राम मोटर्स -१,९७,८०८ (दंडाची रक्कम), यमुनाबाई चौधरी ३६,५४,५१८, आशिष भंडारी २५,१४५, राजेश कथुरिया ८९,७५०, सागरमल कांकरिया ४३,६२३, बद्रिनाथ महाजन १,३०,६८०, त्रिलोधन सिंग छाबडा आरोग्यम् हॉस्पिटल ४३,६५९, संजय सिसोदिया लँडमार्क बिल्डिंग ७८,१६८, संजीव झांबरे २३,८३८, रमेश शर्मा ९२, ८८२, दीपक पाटील ७,२४२, सुरेश पाटील ३३, ७९३, अनिल कांकरिया २७,४४८, भूषण कोल्हे ७१, ८८३, जळगाव जनता बँक ओंकारेश्वर शाखा १,३८,८७७, भारती जाधव लोकमान्य हॉस्पिटल ७६,८४५, रामेश्वर मंडोरे १,१५,०६८, अरुणा माहेश्वरी २६, ०३६, अजित जोगळेकर पीपल्स बँक महाबळ ४५,१७९, प्रकाश झोपे ४०, ७६८, सुनील सूर्यवंशी ५७, ०२४, राजेंद्र सरोदे ७१०००, प्रतिभा चौधरी ३९, ६३०, गोविंद टोके २४,१२८, अमोल महाजन १,११,६७२, हरिश्चंद्र पाटील ७७, ८१२, सतीश पाटील समर्थ हॉस्पिटल ५७, ०२४, शिरीष चौधरी, आस्था हॉस्पिटल ५८, २१२, मधुकर शुरपाटणे ६४, ५३२, सुनील चौधरी ५२,९९० रुपये.