आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समांतर रस्त्यासाठी उद्या केंद्राकडे प्रस्ताव, ‘नही’च्या अधिकाऱ्यांची अायुक्तांसाेबत चर्चा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या समांतर रस्त्याच्या कामासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने नकाशे तयार केले अाहेत. यासाठी लागणाऱ्या खर्चाचे अंदाजपत्रक तयार केले अाहे. हा सर्व प्रस्ताव ते २४ राेजी दिल्ली येथील कार्यालयाकडे सादर करणार अाहेत. तसेच पुढच्या आठवड्यात महापालिकेच्या सहकार्याने अतिक्रमण कारवाई करणार असल्याची चर्चा बुधवारी महापालिकेत अायुक्त नहीचे अधिकारी यांच्यात झाली. 
 
महामार्गावरील वाढत्या अपघातात नागरिकांना जीव गमवावा लागत असल्याने सामाजिक संघटनांनी अांदाेलन उभारले अाहे. जळगावकरांच्या तीव्र भावना लक्षात घेता प्रशासनानेही समांतर रस्त्यांच्या कामाकडे गांभीर्याने लक्ष द्यायला सुरुवात केली अाहे. गेल्या आठवड्यात शहरातून जाणाऱ्या महामार्ग समांतर रस्त्यांच्या विकासासाठी डीपीअार तयार करण्यात अाल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केले हाेते. समांतर रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी ‘नही’चे प्रकल्प संचालक अरविंद काळे यांनी महापालिकेचे मनुष्यबळ यंत्रणा मागितली हाेती. 

त्याच संदर्भात बुधवारी दुपारी काळे यांनी महापालिका अायुक्त जीवन साेनवणे यांची भेट घेतली चर्चा केली. यात २७ २८ फेब्रुवारी राेजी समांतर रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात येणार असल्याने पालिकेचे कर्मचारी, वाहने जेसीबी देण्यात येणार अाहे. तसेच समांतर रस्त्याच्या कामासाठी नकाशे अंदाजपत्रक मंजुरीसाठी दिल्ली येथील कार्यालयाकडे सादर केले जाणार असल्याची चर्चा करण्यात अाली. 
 
पालकमंत्री घेणार स्वतंत्र बैठक 
जिल्हानियाेजन समितीची बैठक अाणि विविध विकासकामांचे उद्घ्‍ााटन करण्यासाठी २५ फेब्रुवारी रोजी शहरात येत असलेले पालकमंत्री चंद्रकांत पाटील पुढील अाठवड्यात शहरातील समांतर रस्ते अाणि महामार्गासंदर्भात स्वतंत्र बैठक आयोजित करणार अाहेत. २५ फेब्रुवारी राेजी समांतर रस्ते कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून ते पुढील बैठकीची तारीख निश्चित करणार अाहेत. दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत बैठकीचा अाग्रह कृती समितीकडून धरला जात अाहे. 
बातम्या आणखी आहेत...