आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अग्निकांडातील कर्मचारी कामावर घेण्याचा विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - महापालिकेच्या वसुली विभागात झालेला गैरव्यवहार लपविण्यासाठी या विभागाचे महापालिकेच्या शाळा क्रमांक एकमधील कार्यालयास सुमारे दोन वर्षांपूर्वी आग लावण्यात आली होती. त्यानंतर वसुली विभागातील 18 अधिकारी व कर्मचार्‍यांवर गुन्हे दाखल झाल्याने त्यांना निलंबित करण्यात आले होते. त्यांना पुन्हा कामावर घेण्याचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात आला आहे.


महापालिकेच्या वसुली विभागाचे ऑडिट करण्याचे काम दोन वर्षापूर्वी हाती घेण्यात आले होते. त्यानंतर अचानक या विभागाला आग लागली होती. याप्रकरणी वसुली विभागातील दोन सहायक आयुक्तांसह 18 कर्मचार्‍यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचबरोबर जोपर्यंत हे कर्मचारी निदरेष सिद्ध होत नाहीत तोपर्यंत त्यांना निलंबित करावे, असा ठराव महासभेने केला होता. त्यानुसार 18 अधिकारी-कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आले आहे. याप्रकरणी न्यायालयात कामकाज सुरू आहे. या कर्मचार्‍यांना पुन्हा कामावर घेण्यासंदर्भात विभागीय आयुक्त रवींद्र जाधव यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत चर्चा झाली. कर्मचार्‍यांच्या निलंबनास दोन वर्षे झाले आहेत. त्यांना नियमानुसार निम्मे वेतन सुरू आहे. त्यामुळे त्यांना न्यायालयाच्या निर्णयास अधीन राहून पुन्हा कामावर घ्यावे, असा मुद्दा बैठकीत आयुक्त दौलतखान पठाण यांनी मांडला. त्यानंतर आता या विषयावर महासभेत चर्चा होणार आहे. महासभेत या विषयास मंजुरी न मिळाल्यास विषय विखंडित करण्यात येईल, अशी माहिती आयुक्त पठाण यांनी दिली आहे.


निलंबित कर्मचारी कोणते ?
निलंबित कर्मचार्‍यांमध्ये जी. एन. फुलपगारे, जी. एम. मंगीडकर, भास्कर जे. टकले, कैलास के. लहामगे, अनिल जी. बगदे, भालचंद्र पंडित खरोटे, के. के. गायकवाड, रामचंद्र शिंदे, प्रभाकर शिंपी, दिनकर बागुल, बी. डी. बुवा, रफिक बागवान, सुनंदा भामरे, ओंकार कोळी, संतोष घटी, भिला सोनवणे, बी. बी. गिते, मधुकर भावसार यांचा समावेश आहे. रामचंद्र शिंदे, बी. डी. बुवा, मधुकर भावसार हे सेवानिवृत्त आहेत.