आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Protecting Individuals Involved In Air: Dr. Phulajhale

सुरक्षेसाठी नागरिकांचाही सहभाग हवा : डॉ.फुलझले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव-देशाच्या सीमारेषेवर केल्या जाणार्‍या कारवाया, बनावट चलनी नोटा वापरात आणून देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी करण्याचे होत असलेले प्रयत्‍न, मादक पदार्थांचा पुरवठा, सायबर सुरक्षा अशी आव्हाने दहशतवाद्यांनी देशाच्या अंतर्गत सुरक्षेसमोर उभी केली आहेत. त्यामुळे सुरक्षा व्यवस्था भक्कम ठेवण्यासाठी देशातील नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन सीबीआयचे मुंबई पोलिस अधीक्षक डॉ.अतुल फुलझले यांनी केले. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात कला व मानवविद्या प्रशाळेंतर्गत असलेल्या संरक्षण व सामरिकशास्त्र विभागातर्फे सोमवारी ‘भारताच्या अंतर्गत सुरक्षेचे भवितव्य : आव्हान आणि प्रतिसाद’ या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्रास सुरुवात झाली. यावेळी डॉ.फुलझले बोलत होते. व्यासपीठावर कुलगुरू डॉ.सुधीर मेर्शाम, पुणे येथील डॉ.अरुण दळवी, प्रा.आर.एच.गुप्ता, प्रा.टी.आर.बोरसे उपस्थित होते.
लोकांमध्ये असुरक्षितता
डॉ.फुलझले म्हणाले की, गेल्या काही वर्षात दहशतवादी हल्ले वाढले आहेत. मुंबईवरील हल्ला, नक्षली कारवाया यामध्ये असंख्य लोकांचे बळी गेलेत. लोकांमध्ये असुरक्षितता निर्माण झाली आहे. देशाची अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी केवळ पोलिस, लष्कर अथवा निमलष्करी दलावर आहे असे नाही, नागरिकांनीदेखील या जबाबदारीसाठी पुढे येण्याची गरज आहे.
नक्षलवाद्यांच्या कारवाया 16 राज्यांमध्ये वाढल्या आहेत. देशांतर्गत हल्ला होतो तेव्हा कोणती संघटना त्यात सहभागी आहे हे लक्षात येते. धार्मिक मूलतत्त्ववाद, अनधिकृत स्थलांतरण, प्रादेशिक व भाषिकवाद, आर्थिक क्षेत्र, वाढती आर्थिक विषमता यामुळे काही कारवाया वाढीला लागल्या आहेत. आदिवासी भागात कंत्राटदारांकडून होत असलेले शोषण पाहून नक्षलवाद्यांनी महाराष्ट्रात गडचिरोली, गोंदिया, भंडारा जिल्ह्यात प्रवेश केला. तेथील तरुणांना सहभागी करून घेतले, विकासाचा अभाव हे नक्षलवादी कारवायांचे मूळ कारण आहे. तसे सांगत डॉ.फुलझले यांनी भारताच्या सीमारेषेवर असलेल्या अफगाणीस्थान, बांगलादेश, चीन, भूतान, म्यानमार, नेपाळ आणि पाकिस्तान या देशांकडून होत असलेल्या कारवायांकडे लक्ष वेधले. प्रा.दळवी यांनी अंतर्गत सुरक्षेवर माहिती दिली. रितूबेन चौधरी यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा.ओंकार पवार यांनी आभार मानले.