आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Protection To Tiger Issue At Jalgaon, Divya Marathi

वढोद्यातील वाघाला मिळणार हक्काचे जंगल, पर्यावरणप्रेमी सुखावले!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- राज्य वन्यजीव मंडळाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत ‘मुक्ताई भवानी माता व्याघ्र संवर्धन राखीव’ क्षेत्रावर मंजुरीची मोहोर उमटली. या मान्यतेमुळे मुक्ताईनगरातील वढोदा वनक्षेत्रातील पट्टेदार वाघाला हक्काचे जंगल उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्ह्यातील पर्यावरणप्रेमींनी यावल अभयारण्याच्या घोषणेनंतर सर्वाधिक महत्त्वाचा निर्णय, अशा शब्दात या घटनेचे स्वागत केले.

वनविभागाचे प्रधान सचिव प्रवीणसिंह परदेशी यांनी नोव्हेंबर 2013 च्या पहिल्या आठवड्यात वढोदा वनक्षेत्राची स्वत: पाहणी केली होती. व्याघ्र अधिवासासाठी वनक्षेत्रातील पूरक स्थिती पाहून आश्चर्यचकित झालेल्या परदेशी यांनी जिल्ह्यातील पर्यावरणप्रेमींच्या उपस्थितीत वढोदा व्याघ्र संवर्धन प्रकल्पाची औपचारिक घोषणा केली होती. दोन महिन्यात प्रकल्पाला अधिकृत मंजुरी मिळेल, असा शब्द त्यांनी दिला होता. हा शब्द त्यांनी पाळला. दरम्यान, प्रधान सचिव परदेशी यांच्या सूचनांनुसार नाशिक वन्यजीव विभागाचे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी 11 जानेवारी 2014 ला वढोदा वनक्षेत्राची पाहणी करून मुक्ताई भवानी माता व्याघ्र संवर्धन विकास आराखडा तयार करण्याची सूचना केली होती.

गुरुवारी झाला निर्णय
राज्य वन्यजीव मंडळाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत बहुप्रतीक्षित ‘मुक्ताई भवानी माता व्याघ्र संवर्धन राखीव क्षेत्रा’ला मंजुरी मिळाली. या वृत्ताला दुजोरा देत प्रधान सचिव प्रवीणसिंह परदेशी यांनी ‘दिव्य मराठी’ने यासंदर्भात सातत्याने पाठपुरावा केल्याचे सांगितले.

वाइल्ड लाइफ अँक्ट 1972
वाइल्ड लाइफ (प्रोटेक्शन) अँक्ट 1972 (सुधारित 2002) नुसार मुक्ताई भवानी माता व्याघ्र संवर्धन राखीव क्षेत्राला मंजुरी देण्यात आली. या प्रकल्पामध्ये वढोदा राखीव जंगलातील कम्पार्टमेंट क्रमांक 539, 544 ते 555, 515, 517, 518 आणि 568 ते 573 चा समावेश राहणार असून लवकरच कायदेशीर दर्जा मिळेल.

पर्यावरणप्रेमींचा पाठपुरावा
नाशिकपासून ते अकोल्यापर्यंतच्या पट्टय़ात कुठेही व्याघ्र प्रकल्प अस्तित्वात नाही. या मुळे वढोद्यातील पट्टेदार वाघांचा नैसर्गिक अधिवास अधिक सुरक्षित व्हावा, यासाठी जिल्ह्यातील पर्यावरणप्रेमींनी सातपुडा बचाव कृती समितीच्या नेतृत्वाखाली मेळघाट ते अनेर डॅम या टायगर कॉरिडॉरची मागणी केली होती. विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी प्रकल्पासाठी प्रयत्न केले. सातपुडा फाउंडेशनचे किशोर रिठे यांची भूमिका मोलाची ठरली