आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोगस प्रमाणपत्र वाटून शिक्षणमंत्र्यांचा निषेध

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(संघटनेतर्फे अशाप्रकारचे पत्रक वाटप करण्यात आले.)
जळगाव- राज्याचे उच्च तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी बोगस पदवी मिळवल्याचा आरोप करत शहरातील राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे मंगळवारी दुपारी 2 वाजता मू. जे. महाविद्यालयाबाहेर बोगस पदवी प्रमाणपत्रे वाटून निषेध करण्यात आला.

दरम्यान, बोगस पदवी प्रमाणपत्र मिळवण्यासंदर्भात तावडे यांनी नकार दिला आहे. मात्र, राज्यभरात विरोधी पक्षांनी याप्रकरणी निषेध करून तावडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. राष्ट्रवादीचे विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस मुविकोराज कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी मू.जे. महाविद्यालयाबाहेर १०० विद्यार्थ्यांना बोगस पदवी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. या वेळी कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणा देत तावडेंचा निषेध केला.
तावडे यांनी शासनाची मान्यता नसलेल्या विद्यापीठातून पदवी घेऊन स्वतला इंजिनिअर म्हणवून घेतले आहे. तसेच ते राज्याचे शिक्षणमंत्री आहेत. प्रामाणिकपणे शिक्षण घेऊन पदवी मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा हा अपमान आहे. त्यामुळे त्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलनप्रसंगी करण्यात आली. या वेळी भरत कर्डीकर, पंकज वाघ, जुबेर खाटीक, केतन पाटील, सागर पाटील, सिद्धेश कुळकर्णी, रूपेश ठाकूर, यशवंत पाटील, युगल जैन, अक्षय महाजन, हरीश चौधरी, विवेक धर्माधिकारी, कृष्णा पाटील, उमेश सूर्यवंशी, अजय पवार, सागर वारुळे, उदय मराठे, आनंद प्रजापत, दीपक झुंजारराव, राकेश पाटील उपस्थित होते.
प्रमाणपत्रावर केला उल्लेख
आंदोलनकर्त्यांनी विद्यार्थ्यांना देण्यासाठी बनावट प्रमाणपत्राची नकल तयार केली होती. त्यात ‘मा.ना. विनोद तावडे विद्यापीठ’ बोगस पदवीप्रदान कार्यक्रम, असा उल्लेख करण्यात आला होता. तसेच विनोद तावडे यांनाच कुलगुरू संबोधले होते. हे प्रमाणपत्र मू.जे.महाविद्यालयातील १०० विद्यार्थ्यांना देण्यात आले.
एनएसयूआयतर्फे निवेदन
तावडे यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडिया (एनएसयूआय)तर्फे अप्पर जिल्हाधिकारी गुलाबराव खरात यांना निवेदन देण्यात आले. या वेळी एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, सुरेंद्र कोल्हे, मनोज चौधरी, दीपक सोनवणे, सागर सपके, जाकीर बागवान, सुमीत पवार, राहुल भालेराव, योगेश देशमुख, सुशील पाटील, महेंद्रसिंग पाटील, चेतन झांबरे आदी उपस्थित होते.
सोशल मीडियावर खिल्ली
तावडे यांचे प्रकरण रविवारी रात्री सोशल मीडियावर चर्चेला आले. त्यानंतर सोमवारी अनेक ग्रुपवर त्यांच्या नावाचे वॉल तयार झाले. त्यात भाजपच्या ‘योगा डे’नंतर आता ‘तावडे’ शिक्षणव्यवस्थेचे ‘विनोद’ केले आहेत. बोगस पदवीधर मंत्री झाले आहेत आणि विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी फक्त एवढेच करा... बोगस लोकांच्या ‘तावडे’तून शिक्षणाला मुक्त करा अशा वॉल सोशल मीडियावर तयार केल्या आहेत.
बातम्या आणखी आहेत...