आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Protest Against Indian Guru Asaram Bapu And Mumbai Gangrape

आसारामबापूने महिलांच्या हातून लावून घेतले होते शरीराला तूप, ही कोणती श्रद्धा?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - महिलांच्या सुरक्षेबाबत कठोर कायदा करून त्या कायद्याची अंमलबजावणी जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत महिलांवर अत्याचार सुरूच राहतील. साधू असो वा संत, ज्याने वाईट कृत्य केले त्याला कठोर शिक्षा द्या, असा सूर महिला असोसिएशनच्या बैठकीत निघाला.

आसारामबापू यांनी केलेल्या कृत्याच्या व मुंबईत महिला छायाचित्रकारावर झालेल्या बलात्काराच्या निषेधासाठी असोसिएशनतर्फे मंगळवारी बैठक झाली. मीना साळी अध्यक्षस्थानी होत्या. या वेळी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना बुधवारी देण्यात येणार असल्याचे ठरवले. उषा सरोदे, स्मिता वेद, मीनाक्षी वाणी, ज्योत्स्ना बर्‍हाटे, कमल पाटील, प्रेमलता वाणी, रुख्मिणी चौधरी, कुमुद गुळवे, ज्योती साळी, हसीना तडवी, मंगला नगरकर, प्रभा शर्मा आदी उपस्थित होत्या.

पुढील स्लाइडमध्ये, भुसावळमधील महिलांनी कशी केली आसारामबापूंची सेवा..