आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयटीआय फीवाढीविरोधात एल्गार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- चारपटीने वाढलेली प्रवेश फी रद्द करावी, नकारात्मक गुण पद्धती बंद करावी या अन्य विविध मागण्यांसाठी स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय)च्या नेतृत्वाखाली आयटीआयच्या विद्यार्थ्यांनी मंगळवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांना दिले.
आयटीआयच्या प्रवेश शुल्कात वाढ करण्यासह परीक्षा शुल्क शासकीय विद्यार्थ्यांसाठी ८५ रुपयांवरून ५५० रुपये, खासगी विद्यार्थ्यांसाठी १५० रुपयांवरून ७०० रुपये, मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे ६० रुपयांवरून तीन हजार रुपये, खुल्यावर्गासाठी ३५० रुपयांवरून सहा हजार रुपये करण्यात आले आहे. यासह ग्रंथालय शुल्क वाढवण्यासह ओळखपत्र शुल्क, सांस्कृतिक कार्यक्रम, इंटरनेट आदी सेवासुविधांच्या नावाखाली भरमसाठ फी आकारली जात आहे. यामुळे विद्यार्थी पालक संतप्त झाले आहेत.

याविरोधात उच्च तंत्र शिक्षण विभागाचा निषेध करण्यात आला. शासकीय आयटीआयपासून मोर्चास सुरुवात झाली. जिल्हाधिकारी कार्यालय येथे एसएफआयचे जिल्हाध्यक्ष पंकज पवार, जिल्हा सचिव लक्ष्मण शेळके, दर्शन गायकवाड, सुदर्शन निकम, हर्षल सूर्यवंशी, रीना पटेल, प्रेमचंद लोहार, धनराज अटवाल यांनी शासनाच्या या अन्यायकारी धोरणाविरुद्ध विद्यार्थ्यांनी संघटित होण्याचे आवाहन केले.
मागण्या अशा
- नकारात्मक गुण पद्धतीचे पूर्णपणे बंद करा.
- परीक्षा फी, प्रवेश फी पुनर्परीक्षा इतर फी वाढ रद्द करा.
- निर्वाह भत्यामध्ये दरमहा एक हजार रुपये वाढ करा
- पेपर पुनर्तपासणीची पद्धत सुरू करा.
- खासगी संस्थांच्या फी वाढीवर अंकुश ठेवा