आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पद्मावती चित्रपटाविरोधात निदर्शने; जिहादचा एकजुटीने विरोध करा -संत नंदकुमार जाधव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- पद्मावती चित्रपटातून राणी पद्मावती यांचा करण्यात आलेला अवमान हा केवळ राजपूत समाजाचा अवमान नसून समस्त हिंदूंचा आहे. त्यामुळे हिंदुंच्या भावना दुखावणारा हा चित्रपट केवळ जळगावच नव्हे तर महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही, असा निर्धार हिंदुत्ववादी संघटनांनी केला आहे. पद्मावती चित्रपटाविरोधात शनिवारी मनपा इमारतीसमोर हिंदुत्ववादी संघटनांकडून उग्र निदर्शने करण्यात आली. 


चित्रपटातून चालणारा चित्रपट जिहाद संपवण्यासाठी समस्त हिंदुत्वनिष्ठांनी एकवटून विरोध करूया, असे आवाहन यावेळी हिंदू जनजागृती समितीचे संत नंदकुमार जाधव यांनी केला. पैशांसाठी हपापलेले नट आणि दिग्दर्शक संजय लिला भन्साली यांना राणी पद्मावती किती महान होत्या, हे काय कळणार? गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान या राज्यात या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. हिंदुत्ववादी पक्षाचे मुख्यमंत्री असलेल्या महाराष्ट्रातही हिंदुत्वनिष्ठांच्या भावना लक्षात घेऊन या चित्रपटावर बंदी घालण्यात यावी,अशी मागणी यावेळी जाधव यांनी केली. हिंदू धर्माची निंदानालस्ती करण्याचे षडयंत्र हिंदू समाज खपवून घेणार नाही. 


पाच राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही बंदी झाली पाहिजेत. अन्यथा पुढे निर्माण होणा ऱ्या परिस्थितीला फडणवीस सरकार जबाबदार राहील, असा इशारा अखिल भारतीय राजपूत महासभेचे महेंद्रसिंह पाटील यांनी दिला. तर अभिव्यक्ती कला स्वातंत्र्याच्या नावाखाली चित्रपटातून होणारा हिंदुंचा इतिहास वीरांगनांचा अवमान सहन करण्यात येणार नसल्याचे सुनील घनवट यांनी सांगितले. अाक्रमकांचा उदोउदो करणा ऱ्यांना देशात राहण्याचा अधिकार नसल्याचे अखिल भारतीय हिंदू महासभेचे गोविंद तिवारी यांनी सांगितले. रणरागिणी शाखेच्या क्षिप्रा जुवेकर यांनी भन्साली यांना देण्यात आलेला पद्मश्री पुरस्कार मागे घेण्याची मागणी केली. स्त्रियांचे चारित्र्य हनन होत असताना तृप्ती देसाई कुठे अाहेत, असा सवाल मोहन तिवारी यांनी उपस्थित केला.


आमदार सुरेश भोळे यांनीही आंदोलनाला पाठिंबा दर्शवून निदर्शनामध्ये सहभाग घेतला. चित्रपटाच्या माध्यमातून हिंदू देवता राष्ट्र पुरूष यांचा अवमान आम्ही कदापि सहन करणार नाही. हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शीत करू नये,अशी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली असल्याचे त्यांनी सांगितले. या आंदोलनात हिंदू जनजागृती समिती, अखिल भारतीय क्षत्रिय महासभा, बजरंग दल, महाराणा प्रताप क्रांतिदल, वारकरी संप्रदाय, विश्व हिंदू परिषद, शिवसेना महिला शाखा, भाजप, सिंधू सेना, बारा बलुतेदार संघटना, बहुभाषिक ब्राम्हण संघ, रणरागिणी शाखा आदी ५१ संघटना सहभागी होत्या. 


बंदीसाठी अामदारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

पद्मावती चित्रपटामध्ये इतिहासाचे विद्रृपीकरण, विकृतीकरण करण्यात अालेले असल्याने िंंहंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या अाहेत. या चित्रपटावर बंदी अाणावी अशी मागणी जळगाव शहराचे अामदार सुरेश भाेळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका पत्राद्वारे केली अाहे 


भन्साली यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार 
आंदोलनानंतरशिवसेनेच्या ग्राहक संरक्षण कक्षाचे महानगरप्रमुख मोहन तिवारी यांनी धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी संजय लीला भन्साली यांच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकुर यांनी ती स्वीकारली.

बातम्या आणखी आहेत...