आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रीडाशिक्षकांकडून मुख्याध्यापकांचा निषेध

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- बैठकीला शिक्षणविस्तार अधिकारी किशोर वायकोळे, जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील, क्रीडा अधिकारी रेखा चौधरी, प्रवीण कोंडेकर हेही उपस्थित होते. याप्रसंगी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांची प्रभारी पदावरून पूर्णवेळ अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी बोलताना किशोर वायकोळे यांनी शाळांतील क्रीडाशिक्षकांना प्रोत्साहन प्रेरणा देत मुख्याध्यापकांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले. जळगाव जिल्हा गेल्या वर्षी शालेय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनात महाराष्ट्रातून पहिल्या पाच क्रमांकांमध्ये असल्याचेही सांगितले. त्याचप्रमाणे क्रीडाशिक्षकांऐवजी मुख्याध्यापकांची बैठक घ्या, असेही सांगण्यात आले.
संघटनांच्यादेखील राज्य राष्ट्रस्तरीय स्पर्धा होतात. त्यात मुख्याध्यापक क्रीडाशिक्षकांना या स्पर्धांत सहभागी होण्यासाठी परवानगी देत नाहीत. त्यामुळे अनेकदा स्पर्धांना जाणे शक्य होत नाही विद्यार्थ्यांचेही नुकसान होते. ते या स्पर्धांपासून वंचित राहतात. परंतु, मुख्याध्यापक शाळा याकडे दुर्लक्ष करतात, अशी खंत राज्य सॉफ्टबॉल असोसिएशनचे प्रदीप तळवेलकर यांनी व्यक्त करत निषेध केला. उपस्थित क्रीडाशिक्षक पदाधिकाऱ्यांनीही यास दुजोरा दिला.
सुनंदा पाटील यांनी सांगितले की, येत्या २३ जुलैपासून शालेय क्रीडा स्पर्धांना सुरुवात होणार आहे. याबाबतचे वेळापत्रक उपस्थितांना देण्यात आले. मात्र, आवश्यकतेनुसार त्यात बदल होण्याची शक्यता आहे. तसेच तालुक्याला १० नवीन खेळही देण्यात आले. परंतु, नवीन खेळांच्या संघटनांनी त्या खेळांचे अॅफिलिएशन प्रमाणपत्र जमा करावे, अन्यथा स्पर्धा होणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.
२३ जुलैपासून शालेय स्पर्धा
शाळेतील मुख्याध्यापक क्रीडाशिक्षकांना अनेक स्पर्धांत सहभागी होण्यासाठी सहकार्य करत नाहीत. परिणामी, विद्यार्थीदेखील यापासून वंचित राहतात. त्यामुळे क्रीडाशिक्षकांनी बैठकीत मुख्याध्यापकांचा जाहीर निषेध केला. शालेय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाबाबत जिल्हा क्रीडा संकुल कार्यालयात गुरुवारी बैठक झाली. या वेळी जिल्ह्यातील विविध क्रीडा संघटनांचे पदाधिकारी क्रीडाशिक्षक उपस्थित होते.
बातम्या आणखी आहेत...