आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसटी संप: कर्मचाऱ्यांची आगारात घोषणाबाजी, मुलाबाळांसह प्रवाशांची खासगी वाहनांसाठी धावपळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - एसटी कर्मचाऱ्यांनी सोमवारी मध्यरात्रीपासून सुरू केलेल्या संपामुळे मंगळवारी दिवसभर एकही बस आगाराबाहेर पडली नाही. एेन दिवाळी पर्वात एसटीची चाके फिरल्याने दिवाळसणासाठी मुलाबाळांसह निघालेल्या हजारो प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली. अनेकांनी रेल्वे, ट्रॅव्हल्स, खासगी वाहनांनी प्रवास करून आपले इच्छित स्थळ गाठले.
 
संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आगारात एकत्र येत मागण्यांसाठी घोषणाबाजी केली. संपामुळे जळगाव आगाराचे दिवसभराचे २५ लाखांचे तर संपूर्ण विभागाचे दाेन कोटी रुपयांचे उत्पन्न बुडाले. तसेच संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांचे वेतन कपात करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. 
 
एसटी कर्मचाऱ्यांनी सातवा वेतन आयोग, पदनिहाय वेतनश्रेणीसह विविध मागण्यांसाठी हा संप पुकारला आहे. मुख्यमंत्री एसटी कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बोलणी फिसकटल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांनी सोमवारी मध्यरात्रीपासून संपास सुरुवात केली आहे. यात मान्यता प्राप्त कामगार संघटनेसह इंटक अन्य विविध संघटना सहभागी झाल्या आहेत. सकाळी वाजेपासून आगारातून बसेस बाहेर जाणे येणेही बंद झाले होते. धनत्रयोदशीची जिल्हाधिकारी पुरस्कृत जाहीर सुटी असल्याने वाहक-चालकांसह कार्यालयीन कर्मचारीही सहभागी झाले होते. एसटी कामगार सेनेच्या नाममात्र पदाधिकाऱ्यांशिवाय कोणत्याही संघटनांनी विरोध दर्शवला नसल्याचे मान्यताप्राप्त संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. 

एसटी संपाची माहिती आधीच मिळाली असल्याने प्रवाशांनी सकाळपासूनच बसस्थानकात येणे टाळले. प्रवाशांनी बाहेरगावी जाण्यासाठी ट्रॅव्हल्स, कालीपिली, रिक्षा, रेल्वेसह आपल्या दुचाकी वाहनांने प्रवास करणेच पसंत केले. यामुळे नेरीनाका, अजिंठा चौफुली आकाशवाणी चौकासह खोटेनगर या थांब्यांवर प्रवाशांची मोठी गर्दी दिसून आली. रेल्वेचा प्रवास फक्त भुसावळ, अमळनेर, चाळीसगाव, पाचोरा या तालुक्यातच शक्य असल्याने पॅसेंजरसह या ठिकाणी थांबणाऱ्या रेल्वेगाड्यांमध्ये प्रवाशांची संख्या अधिक दिसून आली. अन्य तालुक्यांमध्ये खासगी वाहनांशिवाय पर्याय नव्हता. संपाला काँग्रेस, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसह वीज तांत्रिक कामगार संघटनेने पाठिंबा दिला. 
 
ट्रॅव्हल्स चालकांनी नाकारला प्रस्ताव : प्रादेशिकपरिवहन विभागाने संपामुळे नेरी नाक्यावरील ट्रॅव्हल्स चालकांना संपादरम्यान आपली वाहने बसस्थानकात आणून प्रवासी वाहतूक करण्याचा प्रस्ताव देत पोलिस सुरक्षाही देऊ केली होती. मात्र, ट्रॅव्हल्स असोसिएशनने यास नकार दिला. या ट्रॅव्हल्स बसस्थानकात आल्या असत्या तर जिल्ह्यातील प्रवाशांची सोय होणे शक्य होते. मात्र, एसटी कर्मचाऱ्यांच्या संतप्त भावनांमुळे गोंधळ होण्याची शक्यता लक्षात घेता हा प्रस्ताव टाळल्याचे असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. 
 
खासगी वाहनात वाढ 
संपामुळेजामनेर १३, पाचोरा १०, शेंदुर्णी २६, चोपडा २१, अमळनेर या प्रमाणे वाढ केली. सकाळी ते रात्री पर्यत प्रवासी वाहतूक सुरू असल्याची माहिती असो.च्या सदस्यांनी दिली. 
 
सुरक्षा मिळाल्याने अडचण 
राज्यभरातसुरू असलेल्या संपात एस.टी.कामगार सेना सहभागी नव्हती.चालक शिवाजी हटकर आणि वाहक गाेपाळ पाटील यांनी बस काढण्याचा प्रयत्न केला हाेता परंतु एस.टी.कामगार सेनेच्या सभासदांना पुरेशी सुरक्षा व्यवस्था पुरवली नसल्याने आणि अधिकाऱ्यांचे पाठबळ मिळाल्यामुळे चालक वाहक बसेस बाहेर काढू शकले नाहीत, असे सेनेतर्फे सांगण्यात आले. 
 
संपाचा हा परिणाम 
{ आगारात १३० बसेस जागेवर थांबून 
{ ८५० बसेसची चाके जागेवरच थांबली 
{ हजार कर्मचाऱ्यांचा सहभाग 
{ रात्री पासूनच थांबवल्या लांबपल्ल्याच्या गाड्या 
{ खासगी वाहनाने करावा लागला प्रवास 
{ पोलिसांसह क्युआरटीचे १२ जवान 
बातम्या आणखी आहेत...