आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशांत सोनवणे हत्येतील चाकू जप्त; दांडा, मोबाइल बेपत्ताच

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - प्रशांत सोनवणे याच्या खुनाचा आरोप असलेले मुख्य आरोपी नरेंद्र सपकाळे व त्याची पत्नी लक्ष्मी सपकाळे यांनी खुनासाठी वापरलेला चाकू घटनास्थळावरून पोलिसांच्या स्वाधीन केला.
गुरुवारी नरेंद्र व लक्ष्मी यांना चौकशीसाठी मयत प्रशांतच्या घरासह नरेंद्रचे घर व शेळगाव शिवारातील घटनास्थळी नेण्यात आले होते. गुरुवारी दुपारी 12 वाजता पोलिस उपअधीक्षक विवेक पानसरे यांनी पोलिस ताफ्यासह नरेंद्रच्या घराची तपासणी करून पोलिसांना आढळून आलेल्या रक्ताच्या डागांचे व्हिडिओ शूटिंग केले. तसेच गल्लीतील रस्त्यावर रक्तसदृष्य दिसणाºया डागांचे नमुने पोलिसांनी हस्तगत केले. सोनवणे कुटुंब पूर्वी राहत असलेल्या समोरच्या इमारतीत जाऊन पोलिसांनी चौकशी केली. मात्र, या इमारतीत सध्या भाडेकरू राहत असल्यामुळे कोणत्याही प्रकारचे साहित्य किंवा खुनासंदर्भातील वस्तू आढळून आली नाही. चौकशीदरम्यान परिसरात नागरिकांनी गर्दी केली होती.
सोनवणेच्या शेतात विल्हेवाट - नरेंद्र सपकाळे आणि त्याची पत्नी लक्ष्मी यांनी नगरसेवक कैलास सोनवणे यांच्या शेळगाव शिवारातील शेताच्या बांधावर प्रशांतच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला होता. तत्पूर्वी नरेंद्रने शेळगाव शिवारातील रामभाऊ नाल्यात खुनासाठी वापरलेला चाकू , लाकडी दांडा आणि मोबाइल फेकून दिला होता. गुरुवारी पोलिसांनी नरेंद्रला शेतात नेल्यानंतर त्याने प्रशांतला कशा प्रकारे येथे आणले, येथे काय प्रकार केला? याचे प्रात्याक्षिक करवून घेतले. यानंतर रामभाऊ नाल्यात फेकलेला चाकू हस्तगत करण्यात आला. लाकडी दांडा आणि मोबाइल मात्र मिळून आला नाही.