आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीबीएसई शिक्षकांची मानसशास्त्रीय चाचणी; प्रद्युम्न हत्येनंतर शाळांच्या सुरक्षिततेबाबत सूचना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- गुरुग्रामच्या प्रद्युुम्न या शाळकरी मुलाच्या हत्येनंतर देशातील सर्व सीबीएसई शाळांत शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मानसशास्त्रीय चाचणी करण्याचे आदेश सीबीएसई बोर्डाने काढले आहेत. 

प्रद्युुम्नच्या निर्घृण हत्येनंतर सुप्रीम कोर्टाने सर्व सीबीएसई शाळांची सुरक्षितता तपासण्याचे आदेश बोर्डाला दिले होते. त्यानंतर सीबीएसईने शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या मानसशास्त्रीय चाचण्या करण्याचा फतवाही काढला. याचा अहवाल पोलिस प्रशासनाला सादर करावा लागेल. कर्मचाऱ्यांवरील गुन्ह्यांचीही पडताळणी केली  जाईल.

२ महिन्यांत अहवाल...
- शाळांतील सुरक्षेचा अहवाल दोन महिन्यात बोर्डाकडे द्यावा लागेल.
- शाळा परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे. ते कायम चालू असावे.
- सुरक्षा रक्षकाची नियुक्ती मान्यताप्राप्त संस्थांकडूनच करावी.
- विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत पालकांकडून अभिप्राय घेणे
-  मुलांच्या संरक्षणासाठी व त्यांच्याशी वर्तवणुकीबाबत कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण.
 
चाचणीबाबत अद्याप मार्गदर्शन नाही
सीबीएसईचे परिपत्रक शाळेला प्राप्त झाले अाहे. मात्र, मानसशास्त्रीय चाचणीबाबत अद्याप मार्गदर्शन मिळालेले नाही. इतर सूचनांची अंमलबजावणी करण्याचे काम शाळा व्यवस्थापनाने हाती घेतले .

सुषमा कंची, प्राचार्य- ओरिऑन स्कुल, जळगाव
व्यक्तिमत्वाचे पैलू मानसिक आजार आहे का हे तपासण्यासाठी मानसशास्त्रीय चाचण्या केल्या जातात. यातून  बौद्धिक क्षमता आणि व्यक्तिमत्त्वाच्या पैलूंचा अंदाज बांधला जातो. एकाचवेळी सर्वांची चाचणी करून अंदाज बांधणे ते कितपत शक्य होईल, याबाबत सांशकता आहे.
- डॉ. प्रदीप जोशी, मानसोपचार तज्ज्ञ, जळगाव
बातम्या आणखी आहेत...