आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोलाणीत रोडरोमियोची धुलाई, निर्भया विशेष पथकाने गस्त घालण्याची आवश्यकता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो-)
जळगाव - गोलाणी मार्केटच्या दुसऱ्या मजल्यावर बुधवारी दुपारी वाजेदरम्यान मुलीसोबत म्हसावद येथील रईस बागवान गप्पा मारीत बसला होता. त्या दोंघाच्या हालचाली या संशयास्पद असल्याने नागरिकांनी तरुणाची चांगलीच धुलाई केली. महिला दक्षता समितीच्या सदस्या मंगला बारी यांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे.

रईस हा गोलाणी मार्केटमध्येच एका खासगी क्लासमध्ये प्रशिक्षण घेत आहे. तो गेल्या चार-पाच दिवसांपासून संबंधित मुलीसोबत उभा राहत होता. येथे काही रहिवासी घरेदेखील आहेत; त्यामुळे येथील रहिवाशांना या मुला-मुलींच्या चुकीच्या वागण्यामुळे त्रास सहन करावा लागतो. पहाटे वाजेपासून क्लासेस सुरू होत असले तरीदेखील पहाटे वाजेपासूनच मुले-मुली मार्केटमध्ये हजर झालेली असतात. अशा मुलांना बारी यांनी वारंवार हटकले. संबंधित मुलीला रईस यांनादेखील तशा सूचना दिल्यावरदेखील त्यांच्या त्या दोघांच्या संशयास्पद हालचाली सुरू होत्या. बुधवारीदेखील असाच प्रकार सुरू असल्यामुळे नागरिकांनी रईसची धुलाई केली. त्या वेळी त्याच्या मैत्रिणीने तेथून धूम ठोकली. याप्रकरणी बारी यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी रईसवर प्रतिबंधात्मक कारवाई करून साेडून दिले.

कारवाई थांबली
गेल्यामहिन्यात शहरात रोडरोमिओंचा उच्छाद मोठ्या प्रमाणात वाढला होता. याबाबत ‘दिव्य मराठी’ने प्रकाशझोत टाकल्यानंतर पोलिस प्रशासनाने ‘रोमिओगिरी’ करणाऱ्या टवाळखोरांविरुद्ध धडक कारवाई सुरू केली होती. यात अनेकांवर त्यांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली होती. पोलिसांच्या या भूमिकेमुळे पालकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु गेल्या काही दिवसांपासून पोलिस प्रशासनाची ही धडक कारवाई थांबली आहे.

गोलाणी मार्केटचा परिसर बनला प्रेमीयुगुलांचा अड्डा
गोलाणीमार्केटमध्ये दिवसभर मुले-मुली भटकत असतात; तसेच वरच्या मजल्यावर ती बिनधास्तपणे बसलेली असतात असे प्रकार पहाटे मोठ्या प्रमाणावर दिसत असल्याने पोलिस प्रशासनाने याप्रकाराकडे लक्ष देण्याची गरज आहे. तसेच ज्या व्यक्ती गोलाणी मार्केटमध्ये क्लासेस घेतात त्यांनीदेखील या मुलांना गैरप्रकार करू नये म्हणून समज दिली पाहिजे. निर्भया पथकानेदेखील या परिसरात पहाटे संध्याकाळी अधून-मधून गस्त घालण्याची गरज निर्माण झाली आहे.