आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Public Places In Jalgoan Becoming Dens Of Drug Addicts

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धोकेदायक: रेल्वेस्थानक, स्मशानभूमी बनले गर्दुल्ल्यांचे अड्डे!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- शहरातही रेल्वेस्थानक, स्मशानभूमी, मार्केट परिसरात गदरुल्ल्यांचे अड्डे बनले असून ते प्रवासी व इतर नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. अनेक वेळा हे गर्दुल्ले नशेमध्ये तर्र असताना महिलांची छेड देखील काढतात. त्यामुळे रस्त्याने वापरणे महिलांसाठी मोठे आव्हानच झाले आहे. या गर्दुल्ल्यांचा वेळीच बंदोबस्त झाला नाही तर मुंबईसारखी विपरित घटना जळगावातही घडू शकते.

मुंबईत महिला फोटोग्राफरवर झालेल्या गँगरेपप्रकरणी गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी राज्यभरातील ओसाड जागा, रेल्वेस्थानक परिसरातून गदरुल्यांच्या विरोधात मोहीम राबविणार असल्याचे जाहीर केले आहे. सानेगुरुजी रुग्णालयाच्या पडिक इमारत परिसरात असलेल्या मोकळ्या जागेच्या एका कोपर्‍यावर दिवसभर गदरुल्ल्यांची वर्दळ असते. मार्केटमध्ये खरेदी करण्यासाठी आलेल्या अनेक महिलांची छेड काढण्यापर्यंत या गर्दुल्यांची मजल पोहोचली आहे.