आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाेरट्याला सात महिने सक्तमजुरी, रेल्वे न्यायालयाने सुनावली शिक्षा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ- रेल्वेगाड्यांमध्ये प्रवाशांचे माेबाइल अन्य साहित्य लांबवणाऱ्या चोरट्याला, रेल्वे न्यायालयाचे न्यायाधीश राहुल थाेरात यांनी शुक्रवारी सात महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.

गेल्या वर्षी जुलैला जय किसन तेजपाल (रा. अाकाेट, जि. अकाेला) प्रेरणा एक्स्प्रेसने प्रवास करत हाेते. रात्री वाजेनंतर चोरट्याने त्यांचा माेबाइल लांबवला. याची माहिती मिळताच, जळगाव स्थानकावर अारपीएफ जीअारपीच्या जवानांनी संशयितरीत्या फिरणाऱ्या वाल्मीक निवृत्ती ढाेणे (वय ४०, रा. कुंदलगाव, ता. चांदवड, जि.नाशिक) याची चाैकशी केली. त्याच्याजवळून सहा माेबाइल, चार्जर पोलिसांनी जप्त केले. जप्त केलेल्या एका माेबाइलवरून पोलिसांनी जय किसन तेजपाल यांना फोन लावला. त्यांनी माेबाइल चाेरीची घटना पोलिसांना सांगितली. त्यांच्या फिर्यादीवरून भुसावळ लाेहमार्ग पाेलिस ठाण्यात फिर्याद दाखल झाली. या प्रकरणाचे कामकाज रेल्वे न्यायालयात चालले. सरकारी वकील सुभाष कासार यांनी अारपीएफ जवान प्रकाश यादव, चंद्रप्रकाश तिवारी, हवालदार हेमराज अांबेकर यांच्यासह पाच जणांच्या साक्षी नाेंदवल्या. गुन्हा सिद्ध झाल्याने ढोणेला सहा महिने सक्तमजुरी ५०० रुपये दंड. तसेच दंड भरल्यास दिवस कैद सुनावली. तर मुंबई पाेलिस अॅक्ट १२४नुसार एक महिन्याची कैद २०० रुपये दंड आणि दंड भरल्यास तीन दिवस कैद सुनावली. जप्त केलेल्या पाच मोबाईलचा लिलावा होणार आहे.