आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नववर्षाची जळगावकरांना पुरी-अजमेर एक्स्प्रेसची भेट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - हिंदू-मुस्लिम बांधवांचे र्शद्धास्थान असलेली दोन महत्त्वाची धार्मिक स्थळे जोडणारी अजमेर-पुरी एक्सप्रेस 31 डिसेंबरला मध्यरात्री 12.40 वाजता जळगाव स्थानकावर येईल. रेल्वेकडून हिंदू-मुस्लिम भाविकांना ही नव्या वर्षाची अनोखी भेट मिळाली आहे.

पुरी-अजमेर गाडी सुरू करण्याबाबत अमळनेर येथील प्रवासी संघाचे अध्यक्ष जेठमल जैन, राजू काझी, डॉ. इम्रान अली, रतिलाल चव्हाण, महम्मद युसूफ यांनी अनेक वर्षांपासून रेल्वेकडे मागणी लावून धरली होती. खासदार ए.टी.पाटील यांच्यामार्फत पाठपुरावा सुरू असल्याने या गाडीला प्रतिसाद रेल्वे मंत्नालयाने दिला होता. त्यात गाडीला मंजुरी मिळाली होती. मात्र अद्यापर्यंत वेळापत्रक जाहीर झाले नव्हते ते आता करण्यात आले आहे.

दोन धार्मिक स्थळे
जगन्नाथपुरी हिंदूंचे व अजमेर मुस्लिमांचे ही दोन धार्मिक स्थळे जोडणारी पुरी-अजमेर ही द्विसाप्ताहिक गाडी (क्रमांक 18421/ 18422) 31 डिसेंबरपासून धावणार आहे. पुरीला भेट देण्यासाठी हिंदू भाविक तर ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या पवित्न दग्र्यास भेट देण्यासाठी मुस्लिम बांधवांना या रेल्वे सुविधेचा मोठा लाभ होणार आहे. भुसावळ, जळगाव, अमळनेर, धरणगाव, एरंडोल, चोपडा, भडगाव, पारोळा, धुळे, दोंडाईचा, शिंदखेडा, शिरपूर येथील भाविकांना येथून आरक्षण करता येणार असल्याने भाविकांची मोठी गैरसोय दूर होणार आहे.

देण्यात आलेले थांबे..!
या गाडीला दोन्ही दिशांना खुर्दा रोड, भुवनेश्वर, मंचेश्वर, धेनकेनल, तलछेर रोड, एंगुल, रेराखोल, संबलपूर, बरगृह रोड, बोलानगीर, तितलागड, कांताबंजी, खरियार रोड, महासमुंद, रायपूर, दुर्ग, गोंदिया, नागपूर, वर्धा, बडनेरा, अकोला, मलकापूर, भुसावल, जळगाव, अमळनेर, नंदुरबार, सुरत, बडोदरा, अहमदाबाद, साबरमती, मेहसाना, पालनपूर, आबूरोड, सिरोही रोड, फालना, रानी, मारवाड जंक्शन व ब्यावर येथे हे थांबे राहतील.

असे आहे वेळापत्रक
जळगाव स्थानकावर या गाडीचे आगमन प्रथमत: 31 डिसेंबरला मध्यरात्री 12.40 वाजता होणार आहे. दर बुधवार व शनिवारी मध्यरात्री ही गाडी याच वेळेला जळगावला येईल व अजमेरकडे जाईल. तर शनिवार व बुधवारी ही गाडी पुरीला जाण्यासाठी दुपारी 1.55 वाजता राहील. या गाडीला 16 डबे असणार आहे. त्यात एक सेकंड एसी., तीन थर्ड ए.सी., सात द्वितीय शयनयान कक्ष तर तीन द्वितीय सवर्साधारण र्शेणीचे डब्बे जोडले आहे.