आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिघाडामुळे पुरी एक्स्प्रेस जळगावात तास थांबून

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - जळगाव रेल्वेस्थानकावर आलेली पुरी-अहमदाबाद एक्स्प्रेस (गाडी नं. १८४०५) तांत्रिक बिघाडामुळे तब्बल पावणे दाेन तास रेल्वेस्थानकावर गुरुवारी थांबून हाेती.

पुरी एक्स्प्रेसची जळगाव स्थानकावर येण्याची वेळ ९.२० वाजताची आहे. परंतु गाडी रात्री १०.४८ वाजता पुरी एक्स्प्रेस जळगाव रेल्वेस्थानकावर आली. त्या वेळी गार्डच्या डब्याचे चाक नादुरुस्त असल्याचे लक्षात आले. सीएनडब्ल्यूचे कर्मचारी तत्काळ रेल्वेस्थानकावर पाेहोचले. त्यामुळे दीड तास गाडी अंडरमेंटनन्स हाेती. रात्री १२.२५ वाजता डब्याचे चाक दुरुस्त झाल्यानंतर गाडी रवाना झाली. दरम्यान, रेल्वेस्थानकावर तब्बल पावणे दाेन तास गाडी थांबून असल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला. प्रशासनाकडून नेमके कारण सांगितले जात नव्हते. आधीच उशिरा धावत असलेल्या पुरी एक्स्प्रेसला उशीर झाल्याने प्रवाशांच्या संतापात अधिक भर पडला.