आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावातील विद्यार्थ्यांना लागले ‘पुरुषोत्तम’चे वेध;

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- महाविद्यालय आणि त्यामधील विद्यार्थी म्हटले की तेथे कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या अँक्टिव्हिटी ह्या सुरूच असतात. नाटक, कला, संगीत, नृत्य या क्षेत्राकडे तर तरुणाईचा अधिक ओढा असतो. सध्या सांस्कृतिक क्षेत्रात तरुणांचे योगदान वाढले असल्याने अनेक उपक्रमांच्या माध्यमातून आपल्यातील प्रतिभाशैली उदयास आणण्याचा त्यांचा प्रय} असतो. 2 ऑक्टोबरपासून सुरू होत असलेल्या पुरुषोत्तम करंडकच्या तयारीत तरुणाई गुंतली आहे. दणदणीत आणि कसून सराव सुरू असून नाटकाच्या सरावास वेग आलेला आहे.
कॉलेजमधील रंगमंचाच्या पडद्याआड टाकलेली ही नजर
महाविद्यालय : धनाजी नाना चौधरी समाजकार्य महाविद्यालय
नाटकाचे नाव : चक्रव्यूह
लेखक व दिग्दर्शक : सपना पाटील

माझ्या पद्धतीची वेशभूषा असलेल्या या नाटकात सामान्य नागरिक विविध समस्यांच्या चक्रव्यूहमध्ये अडकलेले असल्याचे चित्र दाखवण्यात आले आहे. शवागारात बॉम्बस्फोट, बलात्कार, दंगल, खून, अतिरेकी हल्ला यात मेलेली माणसे आणि त्यांच्यासोबत असणारे सर्वसामान्यांचे शव यांच्यात होणारा संवाद प्रेक्षकांना पाहायला मिळेल. यात मूळ भारतीय व विदेशी असणारे एक शव असेल त्याच्या भोवती हे नाटक फिरणार आहे. भारतात सामान्य माणसांचीच कशी नेहमी पिळवणूक होते आणि कोणतीही घटना घडल्यास बळी फक्त सामान्यांचा जातो. हे सामान्य प्रेत विदेशी प्रेतास समजावून सांगते आणि मग त्यावर विदेशी प्रेत म्हणते की, या देशात राहण्यापेक्षा मृत्यू आलेलाच बरा. 12 पात्रांचे हे नाटक असून सर्व सामान्यांच्या प्रश्नांना आणि त्यांच्या

व्यथा मांडण्याचा हा प्रयत्न वेगळ्या मांडणीत केला आहे.
महाविद्यालय : धनाजी नाना चौधरी विद्याप्रबोधिनी सायन्स महाविद्यालय
नाटकाचे नाव : देख भाई देख
दिग्दर्शक, लेखक : गणेश पाटील
महाविद्यालयीन तरुणांशी जुळलेले आणि तरुणांची सद्य:स्थिती दर्शवणारे हे धमाल कॉमेडी नाटक आहे. दोन मित्र शेजारी राहणार्‍या तरुणीच्या प्रेमात पडतात. दोघेही एकाच मुलीच्या प्रेमात पडून विविध प्रकारच्या क्लृप्त्या तिला पटवण्यासाठी करतात. यामध्ये तीच दुसर्‍याच्या प्रेमात असल्याचे त्यांना कळते. त्यांच्या मनात बदल्याची भावना जागृत होऊन तिला निर्मनुष्य जागी नेऊन तिच्या सोबत ते अतिप्रसंग करतात. मात्र, तिला एड्स असल्याचे त्यांना माहीत नसते. म्हणून ती त्यांना नाकारते कारण त्यांचे आयुष्य खराब व्हायला नको, परंतु त्यांना त्यांच्या फळाची शिक्षा मिळते. डोक्यातील राग आयुष्य खराब करू शकते असा संदेश देत नाटकाची सांगता होते.