आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरुषोत्तम करंडक स्पर्धा डिसेंबरमध्ये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - पुरुषोत्तम करंडक स्पर्धा यंदा ते डिसेंबरदरम्यान गंधे सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून मू. जे. महाविद्यालयाचा नाट्यशास्त्र विभाग आणि कलोपासक, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा घेण्यात येत अाहे. यंदा एका महाविद्यालयातील दोन संघांना प्रवेशाची संधी देण्यात येणार अाहे.
यंदा प्केसीई सोसायटीकडे आयोजनाची जबाबदारी आहे. या स्पर्धेत उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद आणि स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ, नांदेड या तिन्ही विद्यापीठातील अंतर्गत महाविद्यालये यहभागी होऊ शकणार आहेत. यात एका महाविद्यालयाच्या जास्तीत-जास्त दोन संघांना सहभागी होण्याची संधी आहे. प्रथम नोंदणी करणाऱ्या २४ संघांना प्रवेश दिला जाणार आहे. २० ऑक्टोबरपासून www.mjcollege.kces.in या संकेतस्थळावर स्पर्धेचे प्रवेश अर्ज उपलब्ध होणार आहे.
अर्जासोबतच नियमावली आवश्यक कागदपत्रांची यादी आहे. १९ नोव्हेंबर रोजी प्रवेश अर्ज भरण्याची मुदत आहे. अधिक माहितीसाठी हेमंत पाटील, दिनेश माळी यांच्याशी संपर्क साधावा.

मूजे देणार सरावासाठी साहित्य
मू.जे.महाविद्यालयाच्यानाट्यशास्त्र विभागाकडे एकांकिका सादर करण्यासाठी आवश्यक असलेले तंत्र साहित्य उपलब्ध आहे. सहभागी होणाऱ्या संघास सादरीकरण तालिमीसाठी साहित्य पुरविण्याची जबाबदारी मूजेच्या नाट्यशास्त्र विभागाने घेतली आहे. तसेच या वर्षी केसीई सोसायटीकडे यजमानपद असल्यामुळे मूजेचा संघ स्पर्धेत सहभागी होणार नसल्याचे आधीच जाहीर केले अाहे.

बातम्या आणखी आहेत...