आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महानोरांना पुरुषोत्तम पुरस्कार; शहाद्यात 9 ऑक्टोबरला वितरण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शहादा- पी.के. पाटील फाउंडेशनतर्फे कविवर्य, पद्मश्री ना. धों. महानोर आणि धुळे येथील इतिहासाचार्य वि. का. राजवाडे इतिहास संशोधन मंडळाला पुरुषोत्तम पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 

पी. के. पाटील यांच्या जयंतीनिमित्त उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींसह संस्थेला २००३ पासून पुरुषोत्तम पुरस्कार देण्यातयेत आहे. यंदाचा पुरस्कार पद्मश्री ना. धों. महानोर धुळे येथील इतिहासाचार्य वि. का. राजवाडे इतिहास संशोधन मंडळाला जाहीर झाला आहे. एक लाख रुपये मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुरस्काराचे वितरण 9 ऑक्टोबरला सकाळी साडेनऊ वाजता साने गुरुजी प्रसारक संस्थेच्या सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात होईल. 
बातम्या आणखी आहेत...