आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • R.R. Patil Election Rally At Chopda,latest News In Divya Marathi

उद्योगपतींना पाठीशी घालणारे सरकार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चोपडा- लोकसभानिवडणुकीत शेतकऱ्यांचे तारणहार म्हणवणाऱ्या मोदींच्या राज्यात कापसाला किती भाव आहे, हे त्यांनी अगोदर सांगावे. तसेच कापसाच्या भावासाठी आंदोलन करणारे हे मोदी सरकार शेतकऱ्यांच्या जीवावर उठले आहे. हे सरकार उद्योगपतींना पाठीशी घालणारे असल्याची टीका चोपड्यात आर.आर.पाटील यांनी केली.

चोपडा येथे राष्ट्रवादीच्या उमेदवार माधुरी पाटील यांची प्रचार सभा झाली. या वेळी माजी गृहमंत्री आर.आर.पाटील बोलत होते. व्यासपीठावर राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील, अरुण गुजराथी, चंद्रहास गुजराथी, माजी आमदार दिलीप सोनवणे, डॉ.सुशीलाबेन शहा, अमृतराज सचदेव, घनश्याम पाटील, गिरीश पाटील, माजी महापौर किशोर पाटील, गोकूळ पाटील, भरत पाटील, शैलजा पाटील, विजया पाटील, आनंदराव रायसिंग, विजय पाटील, अतुल ठाकरे, जगन पाटील, नगरसेवक जीवन चौधरी, हितेंद्र देशमुख, सीताराम पारधी, संजय कानडे, अक्रम तेली, अकिल जहागीरदार, नोमन काझी, पप्पू स्वामी, सचिन सोनवणे उपस्थित होते. या वेळी अजय राजपूत, नीलेश पाटील, प्रवीण चौधरी, हेमंत पाटील, सुभाष पाटील यांच्यासह अडावदच्या अनेकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. अमृतराज सचदेव यांनी सूत्रसंचालन केले, तर चंद्रहास गुजराथी यांनी आभार मानले. भाजपला तीनमहिन्यांतच ओहोटी लागली होती. खोट्या अश्चासनामुळे मोदींची लोकप्रियता घसरली आहे. शेतक-यांच्या घरात कांदा येताच त्यावर निर्यातबंदी केली. कापसाला भाव नसल्याने शेतकरी देशोधडीला लागत आहे.

पाकिस्तानलाजशासतसे उत्तर देऊ, असे म्हणणारे मोदी सत्तेनंतर देशात 40 जवान शहीद झाले. तसेच काळ पैसा देशात परत आणू म्हणून आंदोलन करणारे रामदेवबाबा कुठे गेले? असा सवालही त्यांनी केला.
नितीनगडकरीदेवेंद्र फडणवीस हे वेगळा विदर्भ करायला निघाले असून, मोदींनी वेगळ्या विदर्भाबाबत पक्षाची अधिकृत भूमिका जाहीर करावी.
जळगावजिल्ह्यातएकनाथ खडसे गिरीश महाजन एकमेकांच्या मतदारसंघात काय करताहेत, हे मला माहिती असून, लोहा लोहा को काटता है.
गावितांचेऐकूनमी चोपड्यात आमदार जगदीश वळवी यांना आमदार केले. पण त्यांनी जनतेची कामे केली नाहीत. त्यामुळे मी तुमची हात जोडून माफी मागतो. खडसेंनीचडॉ.विजयकुमारगावितांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. आता गावितांवर खडसेंनी कोणते गोमूत्र शिंपडले? हे सांगावे. सरदारपटेलांच्यापुतळ्यासाठी दोनशे कोटींची तरतूद करणाऱ्या मोदींनी आता निवडणुकीत शिवाजी महाराजांच्या नावावर मते मागत असताना त्यांच्या पुतळ्यासाठी किती तरतूद केली? हे स्पष्ट करावे. ज्यांनीपाचवर्षांत कधीच हात सोडले नाही, असे पृथ्वीराज चव्हाण जहिरातीतसुद्धा हात सोडता माझ्या खात्याची जाहिरात करीत आहोत. महाराष्ट्रातराष्ट्रवादीचाचमुख्यमंत्री बनेल. त्यामुळे जिल्ह्यातून जास्तीत जास्त जागा निवडून आणा.