आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जमावाच्या मारहाणीत जवानाचा मृत्यू, दोन संशयित ताब्यात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - भुसावळात जमावाने केलेल्या मारहाणीत लष्करी जवानाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री ९.४५ वाजता घडली. मारहाण होण्यापूर्वी जवानाने हवेत दोन राउंड फायर केले होते. त्यामुळे या घटनेतील गुंता अधिक वाढला आहे.

अकील शेख रहेमान (वय ३०, रा. पंधरा बंगला, भुसावळ) हा लष्करातील जवान सुटीवर भुसावळ येथे आला होता. रविवारी रात्री ९.४५ वाजता तो वैतागवाडी परिसरात गेला. त्याच्या अंगावर दागिने होते. त्यामुळे परिसरातील काही जणांनी त्याला लुटण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अकीलने आपल्याकडे असलेल्या पिस्तुलाने हवेत दोन राउंड फायर केले. फायरिंगच्या आवाजामुळे घटनास्थळी मोठा जमाव जमला. जमावाने कुठलाही विचार न करता अकीलला बेदम मारहाण केली. या घटनेची माहिती मिळताच बाजारपेठचे पोलिस निरीक्षक किसनराव नजन पाटील, हवालदार राजू साळुंके, बंटी सैंदाणे, मुन्ना थोरात, श्रीकृष्ण देशमुख, प्रशांत चव्हाण, युसूफ तडवी, संजय पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी अवस्थेत अकील यास १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेने जळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, जिल्हा रुग्णालयाचे डॉ. दत्तात्रय बिरासदार यांनी त्याला तपासणीनंतर मृत घोषित केले. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. घटनास्थळावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेमागील कारणांचा पोलिस शोध घेत आहेत. गोळीबार नेमका कशामुळे झाला, याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. अप्पर पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, डीवायएसपी रोहिदास पवार यांनीही घटनास्थळी पाहाणी केली. आमदार संजय सावकारे यांनीही बाजारपेठ पोलिस ठाण्यात भेट देऊन माहिती जाणून घेतली.
पुढील स्लाईडवर वाचा... दोन संशयित ताब्यात
बातम्या आणखी आहेत...