आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेबीज प्रतिबंधक लसीबाबत शहरातील श्वानमालक उदासीन

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- पाळीव श्वानांना रेबीज होत नसल्याच्या गैरसमजातून शहरातील शेकडो श्वानांना रेबीज प्रतिबंधक लस दिली जात नसल्याची बाब उघडकीस आली असून मोकाट श्वानांच्या दंशानंतर रुग्णालयात येणार्‍या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. पाळलेल्या कुत्र्यांना रेबीज प्रतिबंधक लस देण्यात बहुतांश श्वानमालकांची उदासीनता दिसून येत आहे. ते चावले तरी अनेक जण प्रतिबंधक लस घेत नसल्याचे धक्कादायक वास्तवदेखील समोर आले आहे.

मोकाट कुत्रे घातक
परिसरात फिरणारे मोकाट कुत्रे चावल्यानंतर रेबीज होण्याची शक्यता अधिक असते. रेबीजचा प्रादुर्भाव असणारे श्वान इतर जनावरांसह अन्य कुत्र्यांना चावा घेतात. त्यामुळे या रोगाचा प्रसार अधिक वेगात होत आहे.

रेबीजची लस उपलब्ध
जिल्हा रुग्णालयात दर महिन्याला सरासरी 200 ते 250 जणांना रेबीजची लस दिली जाते. श्वान दंशाच्या रुग्णांना तातडीने लस द्यावी लागत असल्याने ती उपलब्ध असते. पाळीव व मोकाट कुत्र्यांनी चावा घेतलेल्या रुग्णांची एकत्रित नोंद होते. डॉ. नम्रता अच्छा, वैद्यकीय अधिकारी

जनजागृती होतेय
पाळीव कुत्रा असलेल्या सर्वांनी प्रतिबंधक लस घेणे गरजेचे आहे. लसीकरण करून घेण्यासाठी पशुवैद्यकीय दवाखान्यात सुविधा आहे. गेल्या पाच वर्षांत लस घेणार्‍यांचे प्रमाण वाढले असून जनजागृती होणे आवश्यक आहे.
-डॉ. मनीष बाविस्कर, पशुवैद्यकीय अधिकारी