आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हवाला रॅकेटच्या पैशांवर तोतया पोलिसांचा डल्ला, गुन्हे दाखल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव; महामार्गावरशहर वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी बुधवारी पाठलाग करून अहमदनगरच्या चार तोतया पोलिसांना पकडले होते हवालाच्या होणाऱ्या पैशांची लूट करीत असल्याची धक्कादायक माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुनील कुराडे यांनी केलेल्या चौकशीत उघडकीस आली. त्यांचे रॅकेट पोलिस असल्याचे भासवून संबंधितांना मारहाण करून हवालाचा पैसा लुटत होते. काळा पैसा असल्याने या प्रकाराची बोबाबोबही होत नव्हती. त्यामुळे हा प्रकार दबला जात होता.
राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी दुपारी ४.३० वाजता सिग्नलवर विनाक्रमांकाची पांढऱ्या रंगाची बोलेरो उभी असलेली वाहतूक पोलिस सुनील सोनवणे, सुशील चौधरी यांना दिसली. त्यांनी गाडीला थांबवण्यासाठी इशारा केला. मात्र, सिग्नल सुटल्यानंतर ते अजिंठा चौफुलीच्या दिशेने सुसाट वेगात निघून गेले. त्यांचा पाठलाग करून पकडले. त्यांच्याकडून एलसीबी, एसीबीचे बनावट ओळखपत्र, चाकू, गावठी कट्ट्याचे मॅगझीन, तीन पोलिसांच्या लाठ्या आढळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात दिले. संतोष विश्वनाथ कांबळे (वय २३, रा. धामणगाव, जि. बीड), सय्यद आरिफ रफीक (वय २५, रा. रतडगाव, जि. नगर), गणेश लक्ष्मण जाधव (वय ३३, रा. केडगाव, जि. नगर) आणि आकाश वसंतलाल गांधी (वय २८, रा. नगर) असे त्यांची नावे हेत. दाेघे पळून जाण्यात यशस्वी झाले.

चौघांना१४ सप्टेंबरपर्यंत कोठडी
त्याचौघांना गुरुवारी न्यायाधीश प्रतिभा पाटील यांच्या न्यायालयात हजर केले असता, त्यांनी चौघांना १४ सप्टेंबरपर्यंत कोठडी सुनावली आहे. सरकार पक्षातर्फे अॅड. अनिल पाटील यांनी, तर आरोपींतर्फे अॅड. शरीफ पटेल यांनी काम पाहिले.

अनेकपोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल
नवापूर(जि. नंदुरबार), साक्री (जि. धुळे) आणि नरडाणा (जि. धुळे) पोलिस ठाण्यात दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत. त्या दरोड्यांमध्ये पांढऱ्या रंगाच्या बोलेरोचा वापर केल्याचा उल्लेख आहे. यासाठी गुरुवारी साक्री पोलिसांचे एक पथक आरोपींच्या ओळख परेडसाठी आले होते. या आरोपींवर पुण्यातही गुन्हे दाखल असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली आहे. हवालाचा पैसा लुटण्याचे मोठे रॅकेट असण्याची शक्यता असल्याचे पोलिस निरीक्षक कुराडे यांनी ‘दिव्य मराठी’शी बाेलताना सांगितले. पळून गेलेले दोघे या टोळीचे मुख्य सूत्रधार होते. त्यामुळे त्यांच्या शाेधासाठी पथकही पाठविण्यात येणार असल्याचे कुराडे यांनी सांगितले.

पोलिसांनीयोग् कर्तव्य बजावले तर...
प्रत्येकपोलिस अधिकारी, कर्मचाऱ्याने योग्य कर्तव्य बजावले तर मोठ्यातले मोठे गुन्हेगार त्यांच्या तावडीतून सुटणार नाही. बुधवारी वाहतूक पोलिसांनी विनाक्रमांकाची गाडी दिसल्याबरोबर कारवाई केली. त्यामुळे दरोडेखोर तावडीत सापडले.

ही आहे मोडस आपरेंडी’
हवालाचापैसा गुजरातमार्गे येतो. त्या ठिकाणी यांचे मास्टरमाइंड आहेत. हवालाच्या पैशांची गाडी निघाली किंवा कोणी बसने पैसे घेऊन निघाला की, मास्टरमाइंड या चोरट्यांना फोनवरून माहिती द्यायचे. त्यानंतर महाराष्ट्राच्या हद्दीत गाडी आल्यानंतर रात्रीच्या वेळी रस्त्यात गाडी अडवत असत. कोणी काय काम करायचे हे अगोदरच ठरलेले असायचे. गाडी अडविल्यानंतर सर्वात अगोदर गाडीची चावी काढायचे. त्यानंतर पोलिस असल्याचे बनावट ओळखपत्र दाखवायचे. त्यानंतर फायबरच्या काठीने दोघा, तिघांना मारहाण करायचे. त्यानंतर गाडीतील पैसे घेऊन पोबारा करायचे. हे अनेक दिवसांपासून सुरू असल्याचे पोलिस चौकशीत सांगितले.

काळ्या पैशांमुळे बोंबाबोबही नाही
गेल्याअनेक दिवसांपासून हवालाचा येणारा पैसा ते लुटत होते. हवालाचा पैसा म्हणजे काळा पैसा. त्यामुळे त्यांना लुटल्यानंतर बोंबाबोबह होत नव्हती. त्यामुळे याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येत नव्हता. मंगळवारी रात्री सुरतहून हवालाचा पैसा घेऊन एक गाडी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे मंगळवारी रात्री धुळ्यात थांबले. मात्र, पैसे घेऊन येणारा आलाच नव्हता. त्यामुळे हे सहा चाेरटे औरंगाबादमार्गे अहमदनगरला जाणार हाेते.