आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावात अभियांत्रिकी विद्यार्थ्यांकडून रॅगिंग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - बांभोरी येथील एसएसबीटी अभियांत्रिकी महाविद्यालयातील मुलांच्या वसतिगृहात सोमवारी रॅगिंग करणा-या सहा विद्यार्थ्यांवर महाविद्यालयाकडून शुक्रवारी कारवाई करण्यात आली. मात्र, हे रॅगिंग नसून वरिष्ठ वर्गातील मुलांनी कनिष्ठ मुलांना दिलेली वाईट वागणूक असल्याचे प्राचार्यांचे म्हणणे आहे.

8 एप्रिलला महाविद्यालयातील मुलांच्या वसतिगृहात प्रथम वर्षाच्या काही मुलांवर रॅगिंग करण्यात आली. त्यामुळे घाबरलेल्या या विद्यार्थ्यांनी प्राचार्यांकडे तक्रार करण्याचे ठरवले. त्यावर 9 एप्रिल रोजी तिघांना वसतिगृहातीलच अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर विद्यार्थी व पालकांनी प्राचार्यांकडे तक्रार केली.

वसतिगृहातून काढले
रॅगिंगची तक्रार असणारी ही मुले शेवटच्या वर्षाला असून परीक्षेला दीड महिनाच शिल्लक आहे. त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून पोलिस कारवाई न करता त्यांना वसतिगृहातून काढले. तसेच प्रत्येकी 10 हजार रुपये दंडही केला आहे, अशी माहिती प्राचार्य डॉ. एस.के. वाणी यांनी दिली.