आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वत:मध्ये बदल घडवा, यश मिळतेच, रघुरामन यांचे सुखी जीवनाचे फंडे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शंकेखोरमन हाच आपला सर्वात मोठा शत्रू आहे. दररोज आपले त्याच्याशीच द्वंद्व सुरू असते. मनातील या शत्रूला आधी बाहेर काढा. स्वत:तील क्षमतांना ओळखा. स्वत:मध्ये बदल केला तरच विचार करण्याची क्षमता वाढेल आणि यशाचा मार्ग प्रशस्त होईल, असा गुरुमंत्र विख्यात मॅनेजमेंट गुरू एन.रघुरामन यांनी दिला.

दैनिक ‘दवि्य मराठी’च्या नॉलेज सिरीज अंतर्गत रवविारी कांताई सभागृहात रघुरामन यांचा ‘जाणून घ्या मॅनेजमेंटचे फंडे’ या विषयावर व्याख्यान झाले. तीन तास रंगलेल्या या व्याख्यानात रघुरामन यांनी अत्यंत ओघवत्या शैलीत सुखी आयुष्याची गुरुकिल्ली दिली. ‘दवि्य मराठी’च्या ‘मॅनेजमेंट फंडा’तून दररोज भेटणाऱ्या रघुरामन यांचे व्याख्यान ऐकण्यासाठी कांताई सभागृहात रसिक प्रेक्षकांनी प्रचंड गर्दी केली होती. खचाखच भरलेल्या सभागृहात रघुरामन यांनी प्रेरणादायी कथा,उदाहरणे,लघुपटाद्वारे सुखी आयुष्याचे १० फंडे सांगितले. प्रश्नोत्तराच्या माध्यमातून श्रोत्यांनाही, खासकरून तरुणवर्गाला त्यांनी यशाचा गुरुमंत्रही दिला. खान्देशच्या मातीतल्या यशस्वी उद्योगपतींची उदाहरणेदेखील दिली.

दुसऱ्यांची प्रशंसा करा : आपणदुसऱ्यांची प्रशंसा करण्यास विसरलो आहोत. त्यामुळे सकारात्मक ऊर्जा मिळते. सकाळची सुरुवात दोन जणांची प्रशंसा करून करा. त्यामुळे प्रेरणा मिळते.

नेहमीशांत रहा, विचार बदलेल : शांतराहिल्यास विचार करण्यास वेळ मिळतो. तुमचे मन हा तुमचा सर्वात मोठा शत्रू आहे. त्याच्याशी तुम्ही दररोज भांडता. सर्वात अगोदर त्याला स्वत :तून बाहेर काढा. शांत राहिल्याने विचार करण्याची क्षमता वाढते.

कुतूहलअसल्यास ज्ञान मिळेल : प्रत्येकनवीन गोष्टीबाबत कुतूहल असावे. त्यामुळे ज्ञान वाढते. नवीन गोष्टी जाणून घेण्याची सवय लागल्यास माहितीचे भांडार आपल्याकडे जमा होते. मुलगा १४ वर्षांचा होईपर्यंत आपण मुलास लाख ४८ हजार वेळेस तुझ्याकडून हे होणार नाही,असे सांगतो. त्यामुळे आपण मुलांमधील ज्ञान लालसाच संपवतो. त्याच्यातील कुतूहल जाणून घेण्याची क्षमता नष्ट होते.

चांगलामाणूस बना : अगोदरचांगला माणूस बना. एखाद्या गरीबास १० :२० रुपये देऊन तुम्ही चांगला माणूस बनत नाही. आपण आज खूप कमावतो. मात्र, इतरांना देणे विसरलो आहोत.

‘एंटरटेनमेंट नको, एनलाइनमेंट करा,
स्वत:लास्वयंप्रेरीत करावे, शरीरासारखे स्वत:च्या मनही स्वच्छ ठेवा. स्वत:चे ‘एंटरटेनमेंट करण्याऐवजी एनलाइनमेंट’ करा, तुम्हाला काय बनायचे, हे तुमच्या क्षमतेनुसार ठरवा.जीवनात प्रेमाला महत्त्व द्या.

सावद्यातील आर.बी.चौधरी यांची प्रेरणादायी कथा रघुरामन यांनी सांगितली. रहेजा कन्स्ट्रक्शनमध्ये कामाला असताना त्यांना बांधकाम व्यवसायातील होणारी लबाडी खटकत होती. इमारती बांधताना त्यात अनेक त्रुटी राहतात. त्यामुळे इमारतीचे आयुष्य कमी होते. चौधरी यांनी मोडकळीस आलेल्या इमारतींचे नूतनीकरण करण्याचा व्यवसाय सुरू केला. बांधकाम क्षेत्रातील नैपुण्य त्याचबरोबर सचोटी आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर चौधरी यांच्या उद्योगाची उलाढाल हजार कोटींवर गेली आहे. त्याचबरोबर १६ कंपन्यांचे मालक असलेल्या चंद्रकांत राणे यांचाही किस्सा रघुरामन यांनी सांगितला.

असा घडवा बदल
आपलेमन एका रात्रीत बदलणार नाही. मनावरील जळमटं दूर करण्यासाठीही वेळ द्यावा लागेल. वाईट विचारांचा निचरा करण्यासाठी दररोज पाच मिनिटे शांत बसा. प्रार्थना करा. कुटुंबासाठी किमान एक तास वेळ द्या. कुटुंबास सर्वोच्च प्राधान्य द्या.