आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rahul Gandhi News In Marathi, Congress, Student, Mukeshbhai Patel Institute

राहुल सध्या मोदींपेक्षा बरे,काँग्रेस उपाध्यक्षांचा विद्यार्थ्यांशी संवाद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - काँग्रेसचे युवा नेते राहुल गांधी हे आमच्यात येऊन बसले. विद्यार्थ्यांशी विद्यार्थ्यांसारखेच वागले. यातून ते आपले वाटायला लागले. म्हणून आज तरी ते नरेंद्र मोदींपेक्षा बरे वाटतात, अशी भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. शिरपूर येथील नरसी मोनजी विद्यापीठाच्या मुकेशभाई पटेल इन्स्टिट्यूटमध्ये आदिवासी भागातील विद्यार्थ्यांशी राहुल गांधी यांनी बुधवारी संवाद साधला. याप्रसंगी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव गावित, माणिकराव ठाकरे आदी उपस्थित होते.


विद्यार्थ्यांनी विचारलेले प्रश्न व राहुल यांची उत्तरे
प्रश्न - आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीत वाढ करता येईल का? आपल्याकडे रोजगार योजना आहेत ?
उत्तर - राज्य व केंद्र सरकारकडून योजनांचा अवलंब होतो. मात्र, दुर्गम भागात शिष्यवृत्ती पोहोचत नाही. यासाठी विलंब लागत असेल, तर कार्यवाही केली जाईल.
प्रश्न- स्पर्धा परीक्षांसाठी आदिवासी भागात मार्गदर्शनपर क्लासेस सुरू करण्यासाठी योजना आहेत का?
उत्तर - ग्रामीण भागात अद्याप क्लासेस नाहीत. नाशिक, नागपूर, औरंगाबाद या शहरात क्लासेस चालतात. तेथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते. आगामी काळात व्यवस्था केली जाईल.
प्रश्न - महिलांसाठी काय करणार?
उत्तर - पंतप्रधान झालो, तर महिलांना सक्षम करण्यासाठी पावले उचलणार.
प्रश्न - आदिवासींच्या संवर्धनासाठी काय करणार?
उत्तर - आदिवासी भाषा व संस्कृती जपण्यासाठी विद्यापीठ तयार करता येईल का हे पाहावे लागेल. त्यातून ही संस्कृती जिवंत ठेवावी लागणार आहे.
प्रश्न - देशाचा विकास रखडतोय काय?
उत्तर - देशात भ्रष्टाचार वाढल्यामुळे आर्थिक बाबींवर परिणाम होत आहे. व्यवसाय मंदावत आहेत. त्यामुळे विकासावर परिणाम होतो.