आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाण्याच्या अवैध धंद्याविराेधात धडक माेहीम; तीन प्रकल्प सील

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- शहरातीलअवैध पाणीविक्री उद्याेगावर कारवाई करण्यासाठी अन्न अाैषध प्रशासन विभागाने मंगळवारपासून धडक माेहीम हाती घेतली अाहे. पहिल्याच दिवशी पथकाने बीअायएस एफडीएची मान्यता नसलेल्या प्रकल्पांची तपासणी केली. यात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या गाैरव एन्टरप्रायझेस (एमअायडीसी), शिवतीर्थ अॅक्वा (विठ्ठलपेठ) श्री अॅक्वा (रामेश्वर काॅलनी) या तिघा प्रकल्पांवर कारवाई करून ते सील करण्यात अाले अाहेत.

अल्प अार्थिक गुंतवणूक करून उभारलेल्या पाणी प्रकल्पातून दरराेज लाखाे रुपयांची पाणीविक्री करून नागरिकांच्या अाराेग्याशी खेळले जात अाहे. फुकटच्या पाण्याची थातूरमातूर प्रक्रिया करून ते विक्री करून पैसा कमवण्याऱ्या उद्याेगाबाबत फेब्रुवारी महिन्यात ‘दिव्य मराठी’ने भंडाफाेड केला हाेता. तसेच याबाबत वृत्तमालिका प्रसिद्ध करून सत्य परिस्थिती जनतेसमाेर मांडली हाेती. या वेळी अन्न अाैषध प्रशासन विभागाने (एफडीए) हात झटकले हाेते. अाता दाेन महिन्यानंतर एफडीएला जाग अाली असून त्यांनी मंगळवारपासून धडक माेहीम हाती घेतली अाहे. पहिल्याच दिवशी एफडीएचे सहायक अायुक्त एम.डी.शाह यांच्या नेतृत्वात अन्न सुरक्षा अधिकारी संदीप देवरे, दिलीप साेनवणे, अार.अार. चाैधरी, अनिल गुजर यांच्या पथकाने निकषांचे पालन करता उभ्या करण्यात अालेल्या पाणी पॅकेजिंग उद्याेगांची तपासणी करण्याचे नियाेजन केले हाेते. त्यानुसार त्यांनी विठ्ठलपेठमधील काेल्हे विद्यालयासमाेरील शिवतीर्थ अॅक्वा, एमअायडीसीतील गाैरव एन्टरप्रायझेस, रामेश्वर काॅलनीतील श्री अॅक्वा, भाेले अॅक्वा, वेव्हेझ अॅक्वा या प्रकल्पांची तपासणी केली. यात त्यांना तीन प्रकल्पांवर त्रुटी अाढळून अाल्याने त्यांनी तिघे प्रकल्प सील केले अाहेत.

७४प्रकारच्या चाचण्या अावश्यक
पॅकेजिंगवाॅटर विक्री करणाऱ्यांना प्रकल्प सुरू करण्यापूर्वी बीअायएसचे मानांकन घ्यावे लागते. त्यासाठी पाण्याची पॅकेजिंग मटेरियलची एनबीएल लॅबकडून तपासणी करावी लागते. मशिनरी, अारअाे सिस्टिम यांचा स्टँडर्ड रिपाेर्ट, अन्न अाैषध प्रशासन विभागाकडून परवानगी अाणि अायएसअाय मानांकन मिळाल्यानंतर प्लँटमध्ये केमिस्ट अाणि मायक्राेबायाॅलाॅजिस्टसह इन हाऊस २७ अाणि काही बाहेरील, अशा एकूण ७४ प्रकारच्या तपासण्यात कराव्या लागतात. शहरातील बीअायएसची मान्यता घेता अवघ्या दोन ते अडीच लाख रुपयांच्या गुंतवणुकीतून अनेक प्रकल्प उभे राहिले अाहेत. ते अन्न अाैषध प्रशासन विभागाच्या रडारवर अाहेत.

माेहीम सुरूच राहणार
अवैधरीत्यापाणीपॅकिंग करून विक्री करणाऱ्यांविराेधात तपासणी माेहीम सुरूच राहणार अाहे. मंगळवारी तीन प्रकल्पांना सील करण्यात अाले. त्यांनी बीअायएसची मान्यता घेतलेली नाही. यापुढेदेखील ही धडक माेहीम सुरूच राहणार अाहे. एम.डी. शाह, सहायकअायुक्त अन्न अाैषध प्रशासन विभाग

या अाढळल्या त्रुटी
कारवाईकरण्यात अालेल्या वाॅटर प्लँटला बीअायएसची मान्यता, अन्न अाैषध प्रशासन विभागाची परवानगी नव्हती. विक्रीसाठी पॅकिंग करण्यात अालेल्या जारवर काेणताही उल्लेख, लेबल लावण्यात अाले नव्हते. प्लँटमध्ये पाणी तपासणीसाठी प्रयाेगशाळा नव्हती. केवळ टीडीएस मीटर लावण्यात अाले हाेते. प्राथमिक चाैकशीमध्ये प्रकल्पातील कर्मचारी मालक यांनी २० ते २५ रुपये किमतीला जार विक्री करीत असल्याचे मान्य केले. पॅकेज ड्रिंकिंगसाठी वापरण्यात अालेले पारदर्शक जार हे फूड ग्रेड अाहेत किंवा नाही, याचा कुठेही उल्लेख करण्यात अालेला नव्हता. जुने जळगावातील शिवतीर्थ अॅक्वा येथे विक्री व्यवसाय करताना दाेन व्यक्ती अाढळून अाले. त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात अालेली नव्हती. वाॅटर पॅकेजिंगची प्रक्रिया बीअायएसच्या निकषांप्रमाणे करण्यात अालेली नाही, तर उघड्यावर, बाहेरच करीत असल्याचे अाढळून अाले. प्रक्रिया करण्यापूर्वी पाण्याची तपासणी तसेच पॅकिंग केलेल्या पाण्याची शुद्धता तपासण्यासाठी काेणतीही प्रयाेगशाळा अथवा अन्य व्यवस्था करण्यात अालेली नव्हती. श्री अॅक्वा येथे घराच्या पुढील भागात प्लँट लावण्यात अालेला अाहे. त्यात स्वच्छतेची काळजी घेण्यात अालेली नव्हती, तर गाैरव एन्टरप्रायझेस येथेदेखील बीअायएसच्या निकषांप्रमाणे प्रक्रिया केली जात नसल्याचे अाढळून अाल्याचे पंचनाम्यामध्ये नमूद करण्यात अाले अाहे.
शिवतीर्थ अॅक्वाची तपासणी करताना अन्न सुरक्षा अधिकारी संदीप देवरे, दिलीप साेनवणे.
जुने जळगावातील शिवतीर्थ अॅक्वा येथे अन्न सुरक्षा अधिकारी संदीप देवरे, दिलीप साेनवणे यांच्या पथकाने तपासणी केली. त्यानंतर त्यांनी ११ पाणी भरलेले जार, ९४ रिकामे जार जप्त केले. तसेच प्लँट पाण्याने भरलेले १२,२९५ रुपयांचे जार सील केले.

एमअायडीसीतीलगाैरव एन्टरप्रायझेस येथे अन्न सुरक्षा अधिकारी अार.अार.चाैधरी अनिल गुजर यांच्या पथकाने २४ जार मशिनरी सील केले.