आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रायगडावर जळगावच्या नगरसेवकाची मद्य पार्टी, शिवभक्तांनी नगरसेवकासह समर्थकांना चाेपले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साेशल मीडियावर व्हायरल फाेटाेंमध्ये नगरसेवक पिंजारी. - Divya Marathi
साेशल मीडियावर व्हायरल फाेटाेंमध्ये नगरसेवक पिंजारी.
जळगाव - छत्रपतीशिवाजी महाराजांची समाधी असलेल्या रायगडावर दारूची पार्टी करण्याचा प्रताप जळगावातील लाेकप्रतिनिधींनी केला. राष्ट्रवादीचे नगरसेवक त्यांचे नातलग असलेल्या या टारगटांना गडावरील शिवभक्तांनी चांगलाच चाेप दिल्याचा व्हिडिअाे व्हायरल झाला अाहे.साेशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फाेटाेंमध्ये राष्ट्रवादीचे नगरसेवक शरीफ पिंजारी पिंप्राळा परिसरातील नगरसेविका पुत्र अतुल बारी यांच्यासह विक्की नावाचा तरुण दिसत अाहे. या प्रकाराबाबत स्पष्टीकरण देण्याच्या भीतीने संबंधितांनी फाेन बंद करून ठेवले अाहेत.
घटनेच्या व्हायरल झालेल्या व्हिडिअाेत एक शिवभक्त संबंधितांना चाेप देत असल्याचे दिसत अाहे. ‘हातपाय जाेडणाऱ्याला हात जाेडू नकाेस, कुठला अाहेस?’ असे शिवभक्ताने विचारले असता त्याने जळगावचा असल्याचे उत्तर दिले अाहे. त्यामुळे जळगावचे नाव याप्रकारामुळे बदनाम झाले अाहे. मिळालेल्या माहितीनुसार १५ दिवसांपूर्वी झालेल्या विधान परिषद
निवडणुकीत जिल्ह्यातील बहुसंख्य मतदारांना प्रत्येकी तीन लाख रुपये देण्यात अाल्याचे बाेलले जात हाेते. या निवडणुकीदरम्यान नगरसेवकांच्या अपेक्षा पूर्ण हाेऊ शकल्या नव्हत्या. तसेच सहलीलादेखील जाता अाले नव्हते. त्यामुळे निवडणुकीनंतर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी सहलीचा बेत अाखला हाेता. त्यानुसार राष्ट्रवादीचे काही नगरसेवक तसेच नगरसेविकांचे पती पुत्र तसेच काही समर्थक काेकणात फिरायला गेले हाेते. दरम्यान दाेन दिवसांपूर्वी या लाेकप्रतिनिधींनी रायगडावर जाण्याचा बेत अाखला. याच ठिकाणी दारूच्या बाटल्या घेऊन जात दारूचे घाेट रिचवले. हा सर्व प्रकार लक्षात येताच काही शिवभक्तांनी फाेटाे काढून तसेच व्हिडिअाे तयार केले. तसेच बेजबाबदार लाेकांना चांगलाच चाेप दिला अाहे. या वेळी काहींनी पळ काढून स्वत:ची सुटकादेखील करून घेतल्याचे सांगितले जात अाहे.

शिक्षा व्हायला हवी
प्रभागातील नागरिकांचे प्रतिनिधींत्व करणाऱ्या लाेकप्रतिनिधींचे काम शहराचे नाव उज्ज्वल करण्याचे असते. परंतु लाेकप्रतिनिधीच जर अशा पद्धतीने भान हरवून रायगडावर महाराजांच्या समाधीसमाेरच असे काम करतील तर त्यांना शिक्षा व्हायला हवी, अशा भावना व्यक्त हाेत अाहे.
बातम्या आणखी आहेत...