आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rail Invalid Travel Issue At Jalgaon, Divya Marathi

महिलेच्या मृत्यूनंतरही रेल्वेस्थानकावर जीवघेणी कसरत सुरूच..

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - धावती रेल्वे पकडण्याच्या नादात गुरुवारी उज्ज्वला पंड्या या महिलेला जीव गमवावा लागला. या घटनेनंतर दुस-या दिवशीही रेल्वेस्थानकावर प्रवासी जीवाची बाजी लावून धावती गाडी पकडत होते, तर काही दरवाजाला लटकून प्रवास करताना नजरेस पडले. एवढेच नव्हे तर एक प्रवासी आपल्या कुटुंबीयांसह रेल्वे रूळ ओलांडत होता.
वास्तविक हा सर्व प्रकार रोखण्यासाठी रेल्वे पोलिसांकडे जबाबदारी सोपवली आहे. परंतु त्यांनाही या प्रकाराबाबत काही एक घेणे देणे दिसत नाही. त्यामुळेच विपरीत घटना घडत आहेत.
दीड महिन्यात प्लॅटफॉर्मवर झालेले अपघात
मृताचे नाव अपघात दिनांक
गोविंदनाथ रामशरण शुक्ल (वय 59) 26 एप्रिल
वलीउल्लाह वजीउल्ला अन्सारी (वय 22) 24 मे
उज्ज्वला नीलेश पंड्या (वय 35) 29 मे