आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rail Stop In Bhusawal For Buddhagaya Blast Issue

भुसावळात रेल रोको आंदोलन; कर्नाटक एक्स्प्रेसला सात मिनिटे अडवले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- बुद्धगया येथील बॉम्बस्फोटाच्या निषेधार्थ राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी सोमवारी दुपारी भुसावळ जंक्शनवर रेल रोको आंदोलन केले. बिहार सरकारविरोधात या वेळी जोरदार घोषणाबाजी करून दोषींना फाशी देण्याची मागणी करण्यात आली.

दुपारी 1.25 वाजता कनार्टक एक्स्प्रेस स्थानकावर येताच आंदोलकांनी सात मिनिटे इंजिनचा ताबा घेतला. फलाट क्रमांक एक आणि तीनवर जमलेल्या पदाधिकार्‍यांनी घोषणाबाजी करून महाबोधी विहार बौद्ध भिक्खूंच्या ताब्यात देण्याची मागणी केली. आरपीआयचे जिल्हाध्यक्ष (गवई गट) राजू सूर्यवंशी, अनुप खोब्रागडे, तृणमूल काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मुन्ना सोनवणे, विजय साळवे, शरद सोनवणे, सिद्धार्थ सोनवणे, बंटी रंधे, पप्पू सुरडकर, रमेश मकासरे, मोहन निकम, लक्ष्मण जाधव, दादा निकम, प्रकाश तायडे, लालाजी ढिवरे, विश्वास खरात, अनिल इंगळे, भगवान निरभवणे आदींनी आंदोलनात सहभाग नोंदवला.

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे सुरक्षा बलातील लोको आणि यार्ड विभागासह आरपीएफ बॅरेकमधील जवान, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव, भुसावळ शहर पोलिस ठाण्यातील 60 पोलिस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात होते. लोहमार्ग विभागाचे पोलिस उपअधीक्षक हरिचंद्र राठोड, निरीक्षक के.एस.पुजारी, रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक अजय यादव यांच्यासह चार सहायक पोलिस निरीक्षक, दहा पोलिस उपनिरीक्षक बंदोबस्तावर नजर ठेवून होते.

या संघटनांनी केला निषेध
गाडगेबाबा बहुद्देशीय संस्था : भुसावळमधील संत गाडगेबाबा बहुद्देशीय संस्थेने हल्ल्याचा निषेध केला. संस्थाध्यक्ष ललिता शेलोडे, सुरेखा शिरसाळे, अँड. एम.एस.सपकाळे, अँड. मोहंमद दाऊदी, जे.बी.कोटेचा, विजय नरवाडे यांनी निवेदन दिले.
तथागत बौद्ध मंडळ : फेकरी येथील तथागत बौद्ध मंडळाचे अध्यक्ष कृष्णा निकम यांनी, महाबोधी बुद्ध विहारातील बॉम्बस्फोटांचा भ्याड हल्ला असल्याचे सांगितले.

रिपब्लिकन युथ फोर्स : महाबोधी बुद्धगयामधील साखळी बॉम्बस्फोटांची उच्च्स्तरीय चौकशीची मागणी रिपब्लिकन युथ फोर्सचे युवा शहराध्यक्ष दीपक सोनवणे यांनी केली आहे.

समता सैनिक दल : समता सैनिक दलाचे जिल्हाध्यक्ष के.वाय.सुरवाडे यांनी पत्रकाद्वारे बुद्धगयेमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांचा निषेध केला. यासंदर्भात झालेल्या बैठकीत बिहार सरकारचा निषेध करण्यात आला. जिल्हा प्रमुख युवराज नरवाडे, उपाध्यक्ष ए.टी.सुरळकर, रमेश सावळे आदी कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

सुरक्षा व्यवस्था भक्कम करा; अंनिस
महाराष्ट्र अंधर्शद्धा निर्मूलन समितीने घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला. इंडियन ब्युरो विभागाने हल्ल्याची पूर्वकल्पना देऊनही स्थानिक सरकार, प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले. या घटनेमुळे केवळ भारतभरातीलच नव्हे, तर जगभरातील बौद्ध बांधवांच्या धार्मिक भावनेवर आघात झाल्याचे समितीने म्हटले आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी बिहार आणि केंद्र सरकारने सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी दूर कराव्यात, अशी समितीची मागणी आहे. भुसावळ शाखाध्यक्ष अध्यक्ष दीपाली मगर, प्रा. दिलीप सुरवाडे, अरुण दामोदर यांनी असे निवेदन प्रसिद्धीस दिले आहे.

बुद्धगयेतील बॉम्बस्फोटांच्या निषेधार्थ सोमवारी भुसावळ जंक्शनवर रेल्वे रोको आंदोलन करण्यात आले. या वेळी तगडा बंदोबस्त लावण्यात आला. जीआरपीने आंदोलकांना प्रतिबंधात्मक नोटिसा दिल्या होत्या.