आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॅसेंजर रद्द; प्रवाशांचे हाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- रेल्वेमार्गाच्यादुहेरीकरणामुळे कुठलीही पूर्वसूचना देता भुसावळ-सुरत पॅसेंजर रद्द करण्यात आल्याने मंगळवारी प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. यामुळे अनेकांना तिकिटाच्या पैशांवरही पाणी सोडावे लागले. चिंचपाडा ते व्यारादरम्यान रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाचे काम सुरू असल्याने मंगळवारी सकाळी 590676 (अप) भुसावळ-सुरत पॅसेंजर अचानकपणे रद्द करण्यात आली. त्यामुळे प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाबद्दल संताप व्यक्त केला. ही गाडी बुधवारीही पाठवली जाणार नसल्याचे जाहीर करण्यात आल्याने या मार्गावर तातडीने प्रवासाची गरज असलेल्यांना एक्स्प्रेस रेल्वे अथवा बसने जाण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.
अनेकांचेपैसे गेले वाया
दिवाळीच्यापार्श्वभूमीवर पॅसेंजर गाड्यांना गर्दी वाढली आहे. गाडी रद्द केल्याने पाळधी, चावलखेडा, धरणगाव, टाकरखेडा, अमळनेर यासारख्या जवळच्या गावी जाणाऱ्या प्रवाशांचे पैसे रेल्वे रद्द झाल्यामुळे वाया गेले. अनेक प्रवाशांना तर पैसे परत मिळतात हे सुध्दा माहीत नव्हते, त्यामुळे त्यांची तिकिटेही वाया गेली. तसेच धरणगाव, अमळनेर येथे नोकरीसाठी अप-डाऊन करणा-यांचेही हाल झाले.
उशिरा दिली सूचना
भुसावळ-सुरतपॅसेंजर जळगाव स्थानकावर सकाळी ९.२० वाजता येते. हजाराे प्रवासी गाडीची वाट बघत असताना ९.३५ वाजता पॅसेंजर रद्द करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. दरम्यान, चाैकशी दालनात गाडी रद्दची सूचना सकाळी वाजता लावाल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी दिली. त्यावेळी ‘गाडी रद्द असताना तिकिटे का विकली?’ असा सवाल संतप्त प्रवाशांनी केला.
पॅसेंजरचे डबे ताप्ती-गंगाला
सुरत-भुसावळरेल्वेमार्गावर दुहेरीकरणाचे काम सुरू असल्याने मंगळवार आणि बुधवार असे दोन दिवस अपची पॅसेंजर रद्द करण्यात आली आहे. मात्र, या गाडीचे स्लीपर कोच ताप्ती-गंगा एक्स्प्रेसला जोडणार आहोत.