आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
भुसावळ- रेल्वे कर्मचारी संघटनाना प्रशासकीय मान्यता मिळवण्यासाठी देशपातळीवर दर पाच वर्षांनी मतदानाची प्रक्रिया पार पाडावी लागते. तीन दिवस चालणार्या या प्रक्रि येला यंदा 25 एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. रेल्वेच्या एकूण 17 झोनमधील 12 लाख कर्मचारी मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यात भुसावळ विभागातील 20 हजार रेल्वे क र्मचार्यांचा समावेश आहे.
रेल्वे कर्मचार्यांच्या अनेक संघटना सध्या अस्तित्वात आहेत. त्यातील अनेक संघटनांना रेल्वे मंत्रालयाची मान्यता मिळाली आहे. या संघटनाना मान्यता मिळवण्यासाठी 2007 मध्ये मतदान घेण्यात आले होते. त्यानंतर आता पुन्हा मतदानाची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. सर्वाधिक मताधिक्य मिळवणार्या संघटनांनाच रेल्वे मंत्रालयातर्फे मान्यता दिली जाणार असल्याने, पदाधिकार्यांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. यासाठी प्रचारदेखील सुरू झाला आहे.
यांनाच आहे मतदानाचा अधिकार
1 फेब्रुवारी 2013 पूर्वी रेल्वेत नियुक्ती मिळालेल्या कर्मचार्यांना या निवडणुकीत मतदानाचा हक्क आहे. गेल्या निवडणुकीपेक्षा यंदा अधिक मताधिक्य मिळवण्यासाठी पदाधिकार्यांनी कामाची आखणी केली आहे.
प्रचारासाठी भिंतींवर घोषवाक्ये लिहिणे, कर्मचार्यांशी प्रत्यक्ष संपर्क साधणे, अशा कामांना यापूर्वीच सुरुवात झाली आहे. देशपातळीवर निवडणूक होणार असल्याने निवडणुकीला अधिक महत्त्व असल्याची माहिती सीआरएमएस संघटनेचे कारखाना मंडळ सचिव डी.एस.महाजन व एनआरएमयू संघटनेचे सचिव अरुण बी.धांडे यांनी दिली.
3 कर्मचारी संघटनेच्या प्रशासकीय मान्यतेला अधिक महत्त्व असते. मान्यताप्राप्त संघटनांच्या पदाधिकार्यांची मते, त्यांनी केलेली आंदोलने यात दखलपात्र ठरतात.
भारतीय रेल्वे दृष्टीक्षेपात..
कामकाजाच्या सोयीनुसार रेल्वेचे 17 झोनमध्ये विभाजन करण्यात आले आहे. या झोनमध्ये रेल्वेचे 58 विभागही समाविष्ट आहेत. प्रत्येक विभागावर डीआरएम दर्जाच्या अधिकार्यांचे नियंत्रण असते. देशभरात रेल्वेचे 12 वर्कशॉप तर पाच कोच फॅक्टर्या आहेत. या सर्व कामकाजाचा गाडा हाकण्यासाठी रेल्वेत 12 लाख कर्मचारी आहेत. प्रशासकीय मान्यताप्राप्त संघटनांच्या माध्यमातून कर्मचार्यांच्या प्रश्नांना वाचा फोडून ते मार्गी लावले जातात.
विभागात 22 मतदान केंद्रे
निवडणुकीसाठी भुसावळ विभागात 22 ठिकाणी मतदान केंद्रांची उभारणी केली जाणार आहे. एकट्या भुसावळ शहरात रेल्वेच्या विविध विभागांसाठी नऊ मतदान केंद्रे असतील. विभागातील सर्व मोठय़ा स्थानकांवर मतदान केंद्रांची सुविधा उपलब्ध असेल. उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची मुदत 19 एप्रिल आहे. रेल्वे महाव्यवस्थापकांकडे निवडणुकीचा अर्ज दाखल केला जातो. त्यानंतर मतदानाची प्रक्रिया पार पाडली जाते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.