आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वेकडे निधी नसल्यामुळे विकास कामांची गती संथ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - सध्या रेल्वेकडे निधी नसल्याने विकास कामांची गती मंदावली आहे, अशी स्पष्ट कबुली डीआरएम महेशकुमार गुप्ता यांनी विभागीय सल्लागार समितीच्या बैठकीत दिली.

डीआरएम कार्यालयातील सभागृहात मंगळवारी विभागीय सल्लागार समितीची बैठक झाली. सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना अधिकार्‍यांनी उत्तरे दिली. या मध्ये सदस्य दगडू महाजन यांनी सावदा येथे वे-ब्रीजच्या कामाला सुरुवात आणि सावदा येथे कंटेनर सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. तर जळगावचे सुभाष सांखला यांनी, वातानुकूलित डब्यात मोबाइल चाजिर्ंगसाठी जास्त सॉकेट तसेच वातानुकूलित डब्यातील पडदे, चादरी खराब असतात, नॅपकिन मिळत नाही अशी तक्रार केली. वाणिज्य विभागाचे वरिष्ठ प्रबंधक एन.जी. बोरीकर यांनी प्रास्ताविक केले. एडीआरएम प्रदीप बारापात्रे यांची उपस्थिती होती.

धुळे येथील सदस्य धनराज विसपुते यांनी, धुळे-चाळीसगाव गाडीतील शौचालय पूर्ववत सुरू करणे, पाचोरा-जामनेर-बोदवड रेल्वेमार्गाचे काम झाल्यास प्रवाशांचा फायदा होईल, याकडे लक्ष वेधले. भुसावळ येथील अनिल आर. चौधरी यांनी पटना-पुणे एक्स्प्रेसला रावेर रेल्वेस्थानकावर थांबा दिल्यास परिसरातील प्रवाशांची सोय होईल, असे सांगितले. भुसावळातील अप साइडकडील बंद पादचारी पूल खुला करण्याची मागणी झाली.

भुसावळात हवे एटीएस पथक
भुसावळ जंक्शनचे महत्त्व आणि देशभरातील दहशतवादी घटनांच्या पार्श्वभूमीवर भुसावळात दहशतवादविरोधी पथक (एटीएस) नियुक्त करावे. यासंदर्भात गृहमंत्रालयाकडे मागणी करावी. अनिल आर.चौधरी, सदस्य, भुसावळ

जळगाव रेल्वेस्थानकावर हवा रॅम्प
अपंग आणि वृद्ध प्रवाशांसाठी जळगाव रेल्वेस्थानकावर स्वयंचलित रॅम्प (जीना)ची व्यवस्था गरजेची असल्याची मागणी केली. हा विषय विचाराधीन असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. सुरेश भोळे, सदस्य, जळगाव

मंगला एक्स्प्रेसला थांबा
भुसावळात थांबणार्‍या दुरांतो आणि संपर्क क्रांती एक्स्प्रेसला कर्मशिअल थांबा आणि तिकीट देण्याची परवानगी मिळावी. राज्यराणी एक्स्प्रेस नाशिकऐवजी भुसावळातून सुटावी. तसेच मंगला एक्स्प्रेसला जळगाव थांबा गरजेचा आहे. विनोद बियाणी, सदस्य, जळगाव