आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वेगेटवरून ‘गेटमन’ फरार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - पिंप्राळा रेल्वे गेटवरील गेटमन शनिवारी रात्री अचानक फरार झाला. त्यामुळे तब्बल तासभर रेल्वगेट गेटमन विनाच होते. त्याच्या जागी तासाभराने दुसरा कर्मचारी दाखल झाला. दरम्यान, रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले होते.

जळगाव-मुंबई रेल्वेलाइनच्या गाड्या जात असलेल्या शहरातील भोईटेनगर रेल्वेगेटवर दुपारी 4 ते रात्री 12 वाजेसाठी ज्ञानेश्वर भानुदास मोरे हा कामावर आला होता. रात्री 9 वाजता तो कोणालाही न सांगता रेल्वेगेट सोडून निघून गेला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे रेल्वेस्थानकावरून होणार्‍या संपर्काला प्रतिसाद मिळत नव्हता. 10 ते 15 मिनिटे नव्हे तर तब्बल तासभर रेल्वेगेट गेटमन विनाच होते. रात्री 10 वाजून 05 मिनिटांनी रेल्वेस्थानकावरून ललित गौतम हा गेटमन कामावर आला. 15 मिनिटानंतर त्यांच्या बदलीवर पुन्हा रवी पीवर या गेटमनने चार्ज घेतला. त्याने सेवाग्राम एक्स्प्रेससाठी रेल्वेगेट बंद केले. या काळात गेट क्रास करणार्‍या वाहनधारकांच्या लक्षात ही बाब आलीच नाही. काहींनी रेल्वेस्टेशनवर संपर्क साधला होता.