आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वेचे उत्पन्न दाेन महिन्यांत तीन टक्के वाढले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - रेल्वे मंत्रालयाने यंदा उन्हाळ्यात हाॅलिडे स्पेशल गाड्या सुरू केल्या हाेत्या. गेल्या वर्षी एप्रिल मे अशा दाेन महिन्यात काेटी १३ लाख १८ हजार तर यंदा काेटी लाख ५५ हजार प्रवाशांनी प्रवास केला. दाेन महिन्यात उत्पन्नात तीन टक्के वाढ झाली अाहे. विशेष तिकीट तपासणी पथकामुळे मात्र उत्पन्नात वाढ झाली अाहे.

उन्हाळी सुटीत सुरू केलेल्या गाड्यांना मुदतवाढ दिली हाेती. लग्नसराईचे दिवस असतानाही त्यांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही. मध्य प्रदेशातील उज्जैनच्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठीही भुसावळ विभागातून विशेेष गाड्या साेडण्यात अाल्या हाेत्या. परंतु या गाड्यांनाही अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. परंतु असे असले तरी रेल्वे प्रशासनाने यंदा गर्दीचा सिझन डाेळ्यासमाेर ठेऊन एप्रिल मे महिन्यात अाेपन डीटेने पथक नियुक्त केले हाेते. त्यात तब्बल ६० तिकीट तपासणीस हाेते. त्यामुळे फुकट्या प्रवाशांकडून माेठ्याप्रमाणात दंड वसूल करण्यात अाला. डीअारएम सुधीरकुमार गुप्ता, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक सुनील मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने ही कारवाई केली. भुसावळ विभागातील वर्ग स्थानकांवर प्रवाशांकडील तिकिटांची कसून तपासणी करण्यावर भर देण्यात अाल्याने उत्पन्न वाढले. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे सुरक्षा बलाने धावत्या गाड्यांमध्ये गस्तही वाढवली अाहे.
दाेन महिन्यांतील प्रवासी संख्या
भुसावळविभागातून सन २०१६ ते २०१७ या अार्थिक वर्षात एप्रिल महिन्यात ५१ लाख ८० हजार, मे महिन्यात ५१ लाख ७३ हजार तर सन २०१५ ते २०१६ या अार्थिक वर्षात एप्रिलमध्ये ५१ लाख ३६ हजार तर मे महिन्यात तब्बल ६१ लाख ८२ हजार प्रवाशांनी प्रवास केला अाहे.
मिळालेले उत्पन्न असे : सन२०१६ ते २०१७ या अार्थिक वर्षात एप्रिलमध्ये ५३ लाख ४१ हजार, मे महिन्यात ५४ लाख ४८ हजार तर सन २०१५ ते २०१६ या वर्षात एप्रिलमध्ये ५५ लाख ४४ हजार, मे महिन्यात ५६ लाख ५६ हजार रुपये उत्पन्न रेल्वे प्रवाशांकडून मिळाले अाहे.
लग्नसराई, उन्हाळीसुट्यांमध्ये प्रवासी संख्या घटली असली तरी एप्रिल अाणि मे अशा दाेन महिन्यात उत्पन्नात टक्के वाढ झाली अाहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा हाॅलिडे स्पेशल गाड्यांची संख्या वाढवण्यात अाली हाेती. सुनील मिश्रा, वरिष्ठवाणिज्य व्यवस्थापक, भुसावळ