आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Railway Passenger Become Railway Police Ear And Eye

प्रवासीच बनणार रेल्वे पाेलसांचे ‘कान-नाक-डाेळे’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - रेल्वेमार्गावरीलगुन्ह्यांच्या प्रमाणात माेठ्या प्रमाणात वाढ झाली अाहे. त्या प्रमाणात पाेलिसांची संख्या वाढवणे सध्यातरी रेल्वेला शक्य नाही. त्यामुळे या गुन्हेगारांना चाप लावण्यासाठी मध्य रेल्वेने एक वेगळीच शक्कल लढवली अाहे. रेल्वेत किंवा परिसरात घडणारे गुन्हे रेल्वे पाेिलसांच्याकिंवा रेल्वे प्रशासनाच्या लक्षात अाणून देणाऱ्या प्रवाशास रेल्वे अाता ते हजार रुपयांपर्यंतचे बक्षीस देणार अाहे. त्यामुळे अाता सर्वसामान्य प्रवासीदेखील रेल्वेचे अािण पाेिलसांचे ‘कान-नाक-डाेळे’ हाेऊ शकतील. विशेष म्हणजे ही याेजना खासगी गुप्तहेरांसाठीही लागू असेल.

रेल्वेमार्गावर सध्या गाडीतून बॅगेची चाेरी, पाॅकेटमारी, गुंगीचे अाैषध देऊन लुटमार करणे, हत्यारांची धमकी देऊन जबरी लूट करणे, अशा घटना वाढत अाहे. असे गुन्हे

करणाऱ्या गुन्हेगारांना पकडण्यासाठी रेल्वे पाेलिस अथक प्रयत्न करूनही त्यांना अपेक्षित यश मिळत नाही. चाेरटे टाेळीने हे गुन्हे करत असल्याने त्यांच्यातील एकाला पकडून त्याचा काहीच फायदा हाेत नाही. अशा वेळी पाेिलसांचा नाईलाज हाेताे. त्यामुळे अाता मध्य रेल्वेने ४५ लाख प्रवाशांनाच पाेिलस बनवले अाहे.

-रेल्वेत घडणाऱ्या गुन्ह्यासंदर्भात अाम्हाला काेणी माहिती पुराव्यासह दिली तर त्याला अाम्ही बक्षीस देताे. बक्षिसाची रक्कम नंतर ठरवली जाते. गुन्ह्याची नाेंद झाल्यावरच

बक्षिसाची रक्कम दिली जाते. शिवाय रेल्वेसंदर्भातील एखादी घटना टाळण्यासाठी जसे अपघात हाेण्याची शक्यता असल्यास त्यासंदर्भात माहिती देणाऱ्यालाही अाम्ही बक्षीस देत असताे. - चंद्रमाेहनिमश्रा,विभागीयसुरक्षा अायुक्त