आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Railway Platform Issue At Jalgson, Divya Marathi

रेल्वे धक्क्यांवरील मालाची चढ-उतार 31पासून बंद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - रेल्वे मालधक्क्यावर येणारा माल वॅगनमधून खाली उतरवणे व प्लॅटफॉर्मवरून वाहून नेण्यासाठी दिलेल्या वेळेत कपात करून दंडाच्या रकमेत सहा पटीने वाढ करण्यात आली आहे. यानिर्णयाच्या निषेधार्थ जिल्हा रेल्वे मालधक्का हाताळणी व वाहतूक ठेकेदार असोसिएशनने 31 मे पासून राज्यभरात कामबंद आंदोलन पुकारले आहे.
कें द्रीय रेल्वे मंत्रालयाच्या रेल्वेबोर्डाने 16 मे 2014 रोजी आदेश काढून प्लॅटफॉर्मवर उतरवलेला माल वाहून नेण्यासाठी दिलेल्या 12 तासांची वेळ कमी करून आठ तास केली आहे. त्यामुळे कामगारांवर प्रचंड ताण वाढणार आहे. तसेच माल उचलून नेण्यास उशीर झाल्यास होणार्‍या दंडाच्या रकमेतही सहा पटीने वाढ केली आहे. त्यामुळे दंडाची रक्कम भरणे कंत्राटदारांना कदापि शक्य होणार नाही. हुंडेकरी आणि माल हाताळणी व वाहतूक ठेकेदारांवर अन्याय असल्याची भावना निर्माण झाली आहे. यासंदर्भात 27 मे रोजी पुणे र्मचंट चेंबर हॉल येथे राज्यभरातील हुंडेकरी व ठेकेदारांची सभा होऊन चर्चा झाली. त्यात रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाचा निषेध करण्यात आला.

यामुळे रेल्वे धक्क्यावरील काम आणि मालाची चढ-उतार बंद होणार आहे. या दरवाढीच्या निषेधार्थ राज्यातील सर्व हुंडेकरी व ठेकेदारांनी 31 मेच्या मध्यरात्रीपासून काम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या बैठकीला महाराष्ट्र ट्रक, टेम्पो, बस असोसिएशनचे अध्यक्ष प्रसन्न पटवर्धन, ऑल इंडिया मोटार कॉँग्रेसचे उपाध्यक्ष प्रकाश गवळी, महाराष्ट्र मालधक्का वाहतूक ठेकेदार अध्यक्ष गुल्लूशेठ आनंद, जळगावचे राधेश्याम व्यास, अशोक परदेशी, राजू करे, केशव पोळ, वासुदेव अग्रवाल तसेच राज्यातील वाहतूक कंत्राटदार उपस्थित होते.