आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य, रेल्वे सुरक्षा बलाचे महािनर्देशक कृष्णा चौधरींनी दिल्‍या सूचना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ- रेल्वेप्रवाशांच्या सुरक्षेला सर्वािधक प्राधान्य देताना महिलांच्या डब्यात काेणी घुसखोरी करणार नाही, यासाठी खबरदारी घ्या. रात्री धावणाऱ्या गाड्यांमधील गस्त वाढवून स्वत:विभागातील अायुक्तांनी याबाबत नियोजन करावे, अशा सूचना रेल्वे सुरक्षा बलाचे महानिर्देशक कृष्णा चाैधरी (दिल्ली) यांनी दिल्या आहेत.
महानिर्देशक चाैधरी यांनी संपूर्ण भारतीय रेल्वेतील वरिष्ठ सुरक्षा अायुक्त आिण अायुक्तांची एक विशेष बैठक दिल्ली येथे घेतली. भुसावळ विभागाचे अायुक्त चंद्र माेहन मिश्र यांच्यासह देशभरातील ६६ विभागांचे रेल्वे सुरक्षा बलाचे उच्चपदस्थ अिधकारी उपस्थित हाेते. प्रत्येक िवभागातील गुन्हेगारी घटनांचा अाढावा महानिर्देशक चाैधरी यांनी घेतला. रेल्वेतील गुन्हेगारी राेखण्यासाठी रेल्वे सुरक्षा बल अाणि लाेहमार्ग पाेिलसांमध्ये समन्वय वाढवणे, यासाठी प्रत्येक विभागात अारपीएफ अाणि जीअारपी दाेन्ही अिधकाऱ्यांनी बैठक घेऊन नियाेजनाची सूचना केली. या वेळी प्रामुख्याने महिलांच्या डब्यातून प्रवास करणाऱ्या पुरुषांवर दररोज कारवाई, रात्रीच्या रेल्वे गाड्यांमध्ये अारपीएफची गस्त वाढवणे, अवैध खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर कारवाई करावी, वारंवार स्थानकावर वाद घालणाऱ्या विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्याचे प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्याची मािहती सूत्रांकडून मिळाली.
गाड्यांतील गस्त वाढणार
भुसावळविभागातून धावणाऱ्यांपैकी १८ गाड्यांमध्ये रात्रीची गस्त अाहे. दाेन महिन्यांत ही संख्या वाढवू. अारपीएफची भरती झाली असून विभागात अाॅक्टाेबर महिन्यात नवीन जवान मिळतील. यानंतर गस्तीचे प्रमाण वाढेल. चंद्रमाेहन मिश्र, अायुक्त,रेल्वे सुरक्षा बल, भुसावळ