आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वेसेवा २३ पासून सुरळीत होण्याचे संकेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - इटारसीजवळ १७ जूनला सेंट्रल केबिनला लागलेल्या आगीमुळे विस्कळीत झालेली रेल्वे वाहतूक अद्यापही सुरळीत झालेली नाही. या घटनेनंतर तब्बल २२ दविसांचा कालावधी उलटूनही गाड्या रद्द होण्याचे सत्र सुरूच आहे. घटनेनंतर २२व्या दविशी म्हणजेच बुधवारी (दि. ८) पुन्हा २४ गाड्या रद्द झाल्या. त्यामुळे प्रवाशांचे आतोनात हाल होत असून, रेल्वेच्या उत्पन्नावरही परिणाम झाला आहे. २३ जुलैपासून सेंट्रल केबिनचे कामकाज सुरळीत झाल्यानंतर रेल्वेसेवा पूर्वपदावर येण्याची शक्यता आहे, अशी माहिती रेल्वे सूत्रांनी दिली.

बुधवारी रेल्वे मंत्रालयाने २४ गाड्या रद्द केल्याची घोषणा केली आहे. त्यात अप मार्गावरील १० तर डाऊन मार्गावरील १४ गाड्यांचा समावेश आहे. रद्द होणा-या गाड्यांमुळे नियोजन कोलमडले आहे.
बुधवारीडाऊन मार्गावरील रद्द गाड्या : पुणेदरभंगा एक्स्प्रेस, एलटीटी आझमगढ एक्स्प्रेस, एलटीटी गोरखपूर एक्स्प्रेस, पुणे जम्मूतवी झेलम एक्स्प्रेस, एलटीटी गोरखपूर एक्स्प्रेस, मुंबई बनारस एक्स्प्रेस, नागपूर रेवा एक्स्प्रेस, एलटीटी राजेंद्रनगर पटना सुपरफास्ट, पुणे पटना एक्स्प्रेस, एलटीटी बनारस एक्स्प्रेस, मुंबई गाेरखपूर एक्स्प्रेस, एलटीटी गोरखपूर एक्स्प्रेस, भुसावळ नागपूर एक्स्प्रेस, भुसावळ इटारसी पॅसेंजर या गाड्या रद्द झाल्या आहेत.

अप मार्गावरील रद्द गाड्या
गोरखपूरएलटीटी एक्स्प्रेस, अलाहाबाद एलटीटी एक्स्प्रेस, जम्मूतवी पुणे झेलम एक्स्प्रेस, रेवा नागपूर एक्स्प्रेस, पटना पुणे एक्स्प्रेस, गोरखपूर एलटीटी एक्स्प्रेस, दरभंगा जनसंग्राम एक्स्प्रेस, राझी एलटीटी एक्स्प्रेस, छपरा सुरत ताप्ती गंगा एक्स्प्रेस, इटारसी भुसावळ पॅसेंजर या गाड्या रद्द झाल्या आहेत.

काम युद्धपातळीवर सुरू
इटारसीतील सेंट्रल केबिन उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. २३ जुलैपासून केबिनचे कामकाज सुरळीत होईल, अशी माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली. २२ जुलैपर्यंत मध्य रेल्वेच्या मुंबई, पुण्याकडे येणा-या अनेक गाड्या रद्द होण्याची शक्यता आहे.