आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Railway Station Food Issue At Jalgaon News In Marathi

रेल्वे स्टेशनवरील जनता खाना गायब; प्रवाशांचे हाल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - सर्वसाधारण प्रवाशांसाठी रेल्वेने सुरू केलेला जनता खाना स्थानकावरून गायब झाल्याचे चित्र सध्या आहे. प्रशासनाचे आदेश धाब्यावर बसवून स्थानकावरील उपाहारगृहामध्ये जनता खान्याऐवजी इतर महागडे पदार्थ दिले जातात. जर एखाद्याने जनता खान्याची मागणी केली तर त्याला वेळ संपली असल्याचे सांगितले जाते. परिणामी परवडणारे खाद्यपदार्थ मिळत नसल्याने सामान्य प्रवाशांची उपासमार होत आहे.

मध्य रेल्वे प्रशासनाने गरीब प्रवाशांना माफक दरात (15रुपये) जनता खाना मिळावा म्हणून प्रत्येक स्थानकावर योजना सुरू केली. प्रत्येक उपहारगृहचालकाला जनता खाना ठेवणे बंधनकारकही केले. मात्र, नियम सर्रास धाब्यावर बसवले जात आहेत. वरिष्ठ अधिकार्‍यांच्या पाहणी दौर्‍यांच्या दिवशी आणि तेवढय़ाच वेळेत जनता खाना उपलब्ध होतो. अधिकारी रवाना होताच जनता खाना गायब होत असल्याचा प्रकार घडत आहे. रेल्वे प्रवाशांच्या माहितीसाठी दश्रनी भागावर मोठय़ा अक्षरात फलक लावण्यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून उपहारगृहचालकांनी छोट्या कागदावर इंग्रजीत लावलेल्या फलकामुळे जनता खानापासून प्रवासी वंचित राहत आहेत. येथील उपहारगृहचालकांकडून यासाठी ठरावीक वेळच ठरविण्यात आली आहे. जेवणाची मागणीही दुपारी 12 वाजेनंतर अधिक असते. मात्र, या वेळेत ते उपलब्ध होत नाही. गुरुवारी 11.30 वाजताच हा साठा संपला असल्याचे उपहारगृहचालकांनी सांगितले.

काय आहे जनता खाना
जनता खानाचे पाकीट 15 रुपयांना मिळते. त्यात 7 पुर्‍या बटाट्याची भाजी, लोणचे, मिरची असते. प्रवाशांनी मागणी करताच दिली जाते.
फलक नसल्यास कारवाई करणार

प्रवाशांना माफक दरात जनता खाना उपलब्ध व्हावा, यासाठी उपहारगृहात ही सुविधा केली आहे. यासह अन्य एका ठिकाणीही प्रवाशांना जेवणाची व्यवस्था आहे. तिकीटधारकांना खाना उपलब्ध करून दिला जातो. फलक नसल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल. एस.ए.कुलकर्णी, स्टेशन प्रबंधक