आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एटीव्हीएम कार्यान्वित होऊनही रेल्वेच्या तिकीट खिडकीवर रांगा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- रेल्वेप्रवाशांची तिकिटासाठी होणारी गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने एटीएम मशीनप्रमाणे कार्य करणारी एटीव्हीएम मशीन तयार केली आहे. स्मार्टकार्डच्या मशीनमधून प्रवाशांना सहज तिकीट मिळते. 10 दिवसांपूर्वीच हे मशीन जळगाव रेल्वे स्टेशनवरील तिकीट घरात बसवण्यात आले होते. परंतु तंत्रज्ञानाचा उपयोग प्रवासी करून घेत नसल्याने तिकीट खिडकीवरील गर्दी कमी झालेली नाही.
स्मार्टकार्डसाठी स्वतंत्र खिडकी
मेट्रो सिटीनंतर रेल्वे प्रशासनाने भुसावळ विभागातील जळगाव रेल्वेस्थानकावर प्रथमच एटीव्हीएम मशीन कार्यान्वित केले आहे. यासाठी लागणारे स्मार्ट कार्ड तत्काळ उपलब्ध होण्यासाठी स्वतंत्र खिडकीही ठेवण्यात आली आहे. मशीनवर तिन्ही भाषेत सहज समजणर्‍या या पद्धतीविषयी माहिती आहे. पॅसेजर, एक्स्प्रेस, सुपरफास्ट गाड्यांची विभागानुसार तिकिटे काढता येणे शक्य आहे. देशभरातील 150 रेल्वेस्टेशनची तिकिटे यातून मिळणार आहेत. लहान मुलांसाठी अर्धे तिकीट काढण्याचीही सोय यात आहे. ज्येष्ठ नागरिक, अपंगांना मिळणार्‍या सुविधेची तिकिटे मात्र या मशीनमध्ये नाही.
सीसीटीव्हीची नजर :
24 तास ही सुविधा कार्यान्वित आहे. गरजेनुसार रक्कम गुंतवून तिकिटासाठी होणारी गर्दी टाळता येणे या मशीनमुळे शक्य आहे. सीसीटीव्हीद्वारे नियंत्रण ठेवले जाणार असल्याचेही रेल्वे प्रशासनाने सांगितले.
असे काढता येते तिकीट
सुविधेचा लाभ मिळवण्यासाठी प्रवाशांना अगोदर 50 रुपयांचे स्मार्ट कार्ड खरेदी करावे लागते. त्यानंतर गरजेनुसार त्याला रिचार्ज करावा लागतो. तिकीट काढताना मशीनच्या स्क्रिनखाली असलेल्या चौकोनी बॉक्समध्ये स्मार्ट कार्ड ठेवावे. त्यानंतर स्क्रिनवर स्टेशनचा पर्याय निवडून आपल्याला कोणत्या स्टेशनचे व कोणत्या क्लासचे तिकीट हवे, या पर्यायाची निवड करून ओके केल्यानंतर मशीन तिकीट देईल. मशीनवर एका व्यक्तीला दिवसाला 10 तिकिटे काढण्याची र्मयादा आहे. स्मार्टकार्डची वैधता एक वर्ष आहे.
सुविधेचा लाभ घेऊन गैरसोय टाळा
410 दिवसांपासून मशीन कार्यान्वित करण्यात आले आहे. जाणकार प्रवासी याचा उपयोग करीत आहेत. अनेकांची तांत्रिक माहिती घेण्याची उत्सुकता नसल्याने ते रांगेतच उभे राहतात. प्रवाशांनी सुविधेची माहिती घेतल्यास वेळेची बचत होईल. यासंबंधीची माहिती मशीनजवळ लावलेली आहे. एस.एन. माळी, मुख्य बुकिंग सुपरवायझर