आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावसह दोनच ठिकाणी बनते रेल्वेचे टॅम्पिंग युनिट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - रेल्वेतजळगाव शहराची ओळख भुसावळमुळे होते. भुसावळ सेंट्रल रेल्वेचे विभागीय मुख्यालयसुद्धा आहे. परंतु रेल्वेशी संबंधित महत्त्वाची असलेली टॅम्पिंग बँक जर्मन तंत्रज्ञानाने जळगावात तयार होते. देशात अलाहाबादनंतर फक्त जळगावच दुसरे केंद्र जिथे टॅम्पिंग बँक तयार होते.

रेल्वेची गती टिकवून ठेवण्यासाठी ट्रॅकिंग मशीन महत्त्वाची जबाबदारी पार पाडते. ते काम ट्रॅकिंग मशीनच्या माध्यमातून होते. या मशीनमधील महत्त्वाचा भाग असलेल्या टॅम्पिंग बँकेच्या माध्यमातून रेल्वेरूळ त्याखालील खडीचे व्यवस्थापन केले जाते. त्यामुळे रेल्वेरूळ सरळ रेषेत राहून खडीचे कुशन तयार केले जाते. मूळचे जर्मनीतील असलेले हे तंत्रज्ञान भारतात रेल्वेच्या अलाहाबाद येथील कारखान्यात तयार केले जाते. त्यानंतर जळगाव येथील औद्योगिक वसाहतीत अभियंता तथा उद्योजक साजिद शेख हुस्नोद्दीन शेख हे २०३ पासून तयार करतात. तीन महिने एक मशिन तयार करायला लागतात. वर्षभरात ४० मशिन जळगावात तयार केले जातात.

५०० कामगारांचे काम
सुमारे५०० कामगारांचे काम हे टॅम्पिंग युनिट करते. जर्मनीत तयार होणा-या या यंत्राची किंमत सुमारे अडीच कोटी असून हजार किलोमीटरपर्यंत त्याची वॉरंटी आहे. जळगावात तयार होणारे मशीन हे अडीच हजार किलोग्रॅम वजनाचे असून त्याची किंमत सुमारे ३५ लाख रुपये आहे. हजार किलोमीटरपर्यंत त्याची वॉरंटी आहे.

काय आहे टॅम्पिंग बँक
रेल्वेरुळाच्यादेखभाल दुरुस्तीसाठी ट्रॅकिंग मशीन महत्त्वाचे आहे. रेल्वेरूळ सुस्थितीत ठेवण्याचे काम हे मशीन करते. या ट्रॅकिंग मशीनमधील टॅम्पिंग बँकमुळे रेल्वे ट्रॅक सेट होत असतो. मशीन रेल्वेचे ट्रॅक दीड फुटापर्यंत उचलून त्या खालील माती काढते. त्यानंतर त्या ठिकाणी खडी पसरवून चांगले कुशन केले जाते. या यंत्राला आठ लोखंडी हात असतात.

लहानपणापासून रेल्वेचे आकर्षण
लहानपणापासूनजिज्ञासू वृत्तीचे असलेले साजिद शेख यांचे वडील शासकीय नोकरीत होते. त्यांनी दहावीनंतर डिप्लोमा केला. व्यवसायात रुची असलेले शेख १९९३ मध्ये फॅब्रिकेशन व्यवसायात उतरले अन् त्यात प्रगती करत गेले. आज आघाडीच्या उद्योजकांमध्ये त्यांचे नाव घेतले जाते.
दिव्य मराठी विशेष
बातम्या आणखी आहेत...